Join us
Daily Top 2Weekly Top 5

बिर्याणीत किडा, पुरी भाजीही कच्ची; प्रवासी उद्विग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2024 11:57 IST

सुंदरराज राठोड यांनी सांगितले की, गोल गुंबज एक्स्प्रेसने बिलासपूरला जात असताना शनिवारी बिर्याणी ऑर्डर केली होती

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : एकीकडे खाजगी एक्स्प्रेस गाड्यांमध्ये आयआरसीटीकडून चांगले जेवण दिल्याच्या प्रतिक्रिया येतात. दुसरीकडे सामान्य गाड्यांमध्ये वारंवार खराब जेवणाच्या तक्रारी येत आहेत पण त्याकडे आयआरसीटीसी दुर्लक्ष करत आहे. 

सुंदरराज राठोड यांनी सांगितले की, गोल गुंबज एक्स्प्रेसने बिलासपूरला जात असताना शनिवारी बिर्याणी ऑर्डर केली होती, परंतु त्या बिर्याणीमध्ये किडा आढळला. काही वेळाने त्यांच्या घशाला त्रास होऊ लागला. आयआरसीटीसीने त्यांची माफी मागितले तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडे तुमची तक्रार पाठवली जाईल, असे आश्वासन दिले.  तर एका अन्य घटनेत एका प्रवाशाने सांगितले की, तिरुचिपल्ली हावडा सेमी फास्ट एक्स्प्रेसने प्रवास करत असताना १०० रुपयांची पुरी भाजी ऑर्डर केली होती. त्यामध्ये बटाट्याची योग्यरीतीने तयार केलेली नव्हती, तसेच पाचही पुऱ्या कच्च्या होत्या. 

टॅग्स :मुंबईबेस्ट