नेहरू सेंटरमध्ये वर्ल्ड आर्ट कॉन्क्लेव्हचे आर्ट एक्स्पो २०२४

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 04:13 PM2024-03-19T16:13:03+5:302024-03-19T16:13:43+5:30

वरळीतील नेहरू सेंटरमध्ये २७ ते ३० मार्च २०२४ या कालावधीत वर्ल्ड आर्ट कॉन्क्लेव्ह आर्ट एक्स्पो २०२४चे आयोजन करण्यात आले आहे.

World Art Conclave's Art Expo 2024 at Nehru Centre | नेहरू सेंटरमध्ये वर्ल्ड आर्ट कॉन्क्लेव्हचे आर्ट एक्स्पो २०२४

नेहरू सेंटरमध्ये वर्ल्ड आर्ट कॉन्क्लेव्हचे आर्ट एक्स्पो २०२४

मुंबई - व्यावसायिक आणि नवोदित कलाकारांसाठी तसेच त्यांच्या कलाकृती प्रदर्शित करण्यासाठी कलाकार केंद्रित व्यासपीठ असलेल्या वर्ल्ड आर्ट कॉन्क्लेव्हच्या वतीने आर्ट एक्स्पो २०२४चे आयोजन करण्यात आले आहे. कलाप्रेमींना इथे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील नामवंत कलाकारांच्या कलाकृती पाहायला मिळणार आहेत.

वरळीतील नेहरू सेंटरमध्ये २७ ते ३० मार्च २०२४ या कालावधीत वर्ल्ड आर्ट कॉन्क्लेव्ह आर्ट एक्स्पो २०२४चे आयोजन करण्यात आले आहे. राजन जाधव आणि प्रविण गांगुर्डे वर्ल्ड आर्ट कॉन्क्लेव्ह २०२४ एक्स्पोचे संचालक आहेत. या प्रदर्शनातील कलाकृती ज्यूरी सदस्यांद्वारे निवडल्या जाणार आहेत. चित्रकला, शिल्पकला, छायाचित्रण आणि मिश्र माध्यमांसह विविध कला शैली आणि प्रकार या कला प्रदर्शनात प्रदर्शित केले जाणार आहेत. वर्ल्ड आर्ट कॉन्क्लेव्ह हा एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा आर्ट एक्स्पो असणार आहे. प्रत्येक कलाकाराची कलाशैली आणि संकल्पना सुसंगतपणे प्रदर्शित करण्यासाठी हि एक व्यासपीठ आहे. वर्ल्ड आर्ट कॉन्क्लेव्हमध्ये कलाकार, गॅलरी, कला तज्ज्ञांसोबत संवाद आणि आर्टग्रुपमध्ये त्यांचे नेटवर्क विस्तारण्याची सुवर्णसंधी कलाकारांना मिळणार आहे. इथे आर्ट टॉक, कार्यशाळा, परिसंवाद, कला प्रात्यक्षिके आणि मनोरंजनाचा समावेश असेल. यामध्ये ३००हून अधिक कलाकारांचे ३००० हून अधिक आर्ट वर्क आणि आर्ट इंस्टॉलेशन असणार आहेत.

रतन साहा, प्रमोदबाबू रामटेके, भगवान रामपुरे, फिओन विल्सन(युके), ज्युडिथ कार्लिन(यूएस), पॅट्रिशिया टर्नर(यूएस) रमाणी नारायण(जर्मनी), एम. नारायण, राजेंद्र कापसे, अर्चना सोंटी, सरबिता दास, पूर्णिमा दाभोळकर, अजय मेश्राम, विठ्ठल मुप्पीडी, श्रिरंग बडवे, किरण होटकर, अजित चौधरी, नंदकुमार गोपाळ कार्ले, एस. विनितकुमार, आण्णा कुरियन, पी. जे. स्टॅलिन, दिनकर जाधव, जगन्नाथ पॉल, ओम स्वामी, पी. ज्ञाना, अमी पटेल, निलाद्री पॉल, आनंद पांचाळ, निलेश वेदे, उमाकांत कानडे, महेश सौंदत्ते आणि बरेच कलाकार वर्ल्ड आर्ट कॉन्क्लेव्हच्या प्लॅटफॉर्मवर त्यांच्या जागतिक दर्जाच्या कलाकृती प्रदर्शित करण्यासाठी सहभागी होत आहे.
 

Web Title: World Art Conclave's Art Expo 2024 at Nehru Centre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई