कपिलच्या सेटवर कामगारांची दगडफेक

By Admin | Updated: May 15, 2014 05:59 IST2014-05-15T05:59:10+5:302014-05-15T05:59:10+5:30

लाइटमनला मारहाण झाल्याप्रकरणी कर्मचारी युनियनने केलेल्या काम बंद आंदोलनाला मंगळवारी हिंसक वळण आले.

Workers' crack on Kapil's set | कपिलच्या सेटवर कामगारांची दगडफेक

कपिलच्या सेटवर कामगारांची दगडफेक

मुंबई : फिल्मसिटीमध्ये लाइटमनला मारहाण झाल्याप्रकरणी कर्मचारी युनियनने केलेल्या काम बंद आंदोलनाला मंगळवारी हिंसक वळण आले. काम बंद आंदोलनाच्या कालावधीत ‘कॉमेडी विथ कपिल’च्या सेटवर शूटिंग सुरू असल्याने कर्मचार्‍यांनी सेटवर दगडफेक सुरू केली. ‘कॉमेडी विथ कपिल’च्या सेटवर झालेल्या या दगडफेकीत पोलीस हवालदार महादेव शिंदे, सुरेंद्र देसाई आणि शंकर पवार हे किरकोळ जखमी झाले आहेत. ट्रॉमा रुग्णालयात जखमींवर उपचार करून सोडण्यात आले आहे. या प्रकरणी बंदोबस्तावरील पोलीस कर्मचार्‍यांना दगडफेक करून सरकारी कामात अडथळा केला व कर्तव्यावरील पोलिसांना कायदेशीर कर्तव्य बजावीत असताना दगडफेक करून जखमी केले म्हणून आरे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सेटवर १२ तासांपेक्षा अधिक तास काम करण्यास नकार दिला म्हणून एका प्रोडक्शन हाऊसच्या अधिकार्‍याने सेटवरील कर्मचार्‍याला धक्काबुकी केली. याच्या निषेधार्थ कर्मचारी युनियनने फिल्मसिटीमध्ये काम बंद आंदोलन पुकारले, मात्र ‘कॉमेडी विथ कपिल’च्या सेटवर शूटिंग सुरूच होते. त्यामुळे आंदोलकांनी दगडफेक केल्याचे आरे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम मोरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Workers' crack on Kapil's set