Join us

महिला लोकल आजपासून विरारपर्यंत धावणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 06:55 IST

गर्दीमुक्त प्रवासासाठी महिला प्रवासी, प्रवासी संघटना यांनी निवेदनातून पश्चिम रेल्वेला भार्इंदर-चर्चगेट आणि वसई रोड-चर्चगेट या महिला विशेष लोकलचा विस्तार न करण्याची विनंती केली होती. मात्र, पश्चिम रेल्वे प्रशासनाने ती धुडकावली.

मुंबई: गर्दीमुक्त प्रवासासाठी महिला प्रवासी, प्रवासी संघटना यांनी निवेदनातून पश्चिम रेल्वेला भार्इंदर-चर्चगेट आणि वसई रोड-चर्चगेट या महिला विशेष लोकलचा विस्तार न करण्याची विनंती केली होती. मात्र, पश्चिम रेल्वे प्रशासनाने ती धुडकावली. आता गुरुवारपासून महिला विशेष लोकलचा विस्तार विरारपर्यंत करण्यात येईल.लोकल वेळापत्रकात नवीन बदल करताना किमान प्रवासी संघटनांना विश्वासात घेणे आवश्यक आहे. वातानुकूलित कार्यालयात बसून वेळापत्रक बनविण्याऐवजी ‘ग्राउंड रिअ‍ॅल्टीत’ प्रवाशांचा अंदाज घेऊन वेळापत्रक तयार केल्यास रेल्वे, प्रवाशांना फायदा होईल. नव्या वेळापत्रकात महिलांना दिलासा नसल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाच्या मुंबई विभागीय रेल्वे प्रवासी सल्लागार समिती सदस्य वंदना सोनावणे यांनी दिली.वसईतील गीता गायकवाड म्हणाल्या की, नवीन वेळापत्रकात महिलांसाठी सुरक्षित प्रवासाची आशा होती. विरारपर्यंत विस्तारीकरणामुळे महिला प्रवाशांना अधिक त्रास होईल. अतिरिक्त बोगींच्या मागणीकडे दुर्लक्ष करून, सध्या धावत असलेल्या महिला विशेष लोकलचा प्रवास आणखी कठीण करत आहे. तर, विस्तारीकरण न करण्याचे परिस्थितीजन्य कारणे देऊनहीपश्चिम रेल्वेने दखल घेतली नाही. त्यामुळे महिला विशेष लोकलमध्ये अपघात झाल्यास जबाबदारी पश्चिम रेल्वेने घ्यावी, अशी मागणी भाजपा प्रवक्त्या शायना एनसी यांनी केली आहे.असे असेल नवे वेळापत्रकसकाळी ९ वाजून ६ मिनिटांनी भार्इंदर-चर्चगेट महिला विशेष लोकल विरार स्थानकातून ८ वाजून ४४ मिनिटांनी चालविण्यात येईल. तसेच वसई रोड येथून ९ वाजून ५६ मिनिटांनी सुटणारी लोकल विरार येथून ९ वाजून ४७ मिनिटांनी सुटेल.पश्चिम रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एसी लोकलचे थांबे वाढलेपश्चिम रेल्वेवर देशातील पहिल्या वातानुकूलित (एसी) लोकलच्या थांब्यात गुरुवारपासून वाढ केली आहे. नवीन वेळापत्रकानुसार एसी लोकल मरीन लाइन्स, चर्नी रोड, ग्रँट रोड, दहिसर, मीरारोड, नायगाव, नालासोपारा स्थानकांवरही थांबेल. तसेच पश्चिम रेल्वेवर १० नवीन फेºया सुरू होणाार आहेत. शिवाय २६ लोकलचा वेग वाढवण्यात आला आहे.

टॅग्स :मुंबईपश्चिम रेल्वे