Women;s Day Special: ... हिनेच घडविले थोर शिवराय, संभाजी अन् शूरवीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2020 16:19 IST2020-03-08T16:16:39+5:302020-03-08T16:19:32+5:30
सासर आणि माहेरची नाती जपण्या अविरत धडपडशी

Women;s Day Special: ... हिनेच घडविले थोर शिवराय, संभाजी अन् शूरवीर
जागतिक महिला दिन
दया, क्षमा, सेवा, सहनशीलता आणि कर्तव्यदक्षता असे स्त्रीची महती
विविध गुणांची खाण असे ही स्त्री धर्माची ख्याती
कन्या होऊनी माता-पित्याची होई, वृद्धत्वाची काठी
सहचारिणी म्हणुनी पतीदेवाच्या राही सदैव पाठी
भगिनी म्हणुनी भावंडांना समाजावून देई धीर
हिनेच घडविले थोर शिवराय, संभाजी आणि शूरवीर
गृहिनी म्हणुनी कुटुंबाचा वाहशी तू भार
माता होवुनी आपल्या बाळा घडविशी संस्कार
सासर आणि माहेरची नाती जपण्या अविरत धडपडशी
आपले आरोग्य जपण्या मात्र केंव्हातरी विसरशी
निर्भय हो, सावध हो, नको बाळगु कशाची भीती
अत्याचाराचा बिमोड करण्या, हवी समाज जागृती
तुम्हा भगिनींना एकच सल्ला, आधी जपा आपले आरोग्य
मग, संसार आणि कामाचे वेळापत्रक होईल सुयोग्य
सेवानिवृत्त परिसेविका
कल्पना रविंद्र बोरकर
सरकारी रुग्णालय, मुंबई