Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर; माता भगिनींनी CM एकनाथ शिंदेंना बांधल्या राख्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2024 18:05 IST

CM Eknath Shinde News: विविध क्षेत्रातील महिला भगिनींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ओवाळून राखी बांधत त्यांचे आभार मानले.

CM Eknath Shinde News: राज्याच्या अर्थसंकल्पात महिला भगिनींसाठी अनेक निर्णय घेऊन त्यांना दिलासा दिल्याबद्दल विविध क्षेत्रातील महिला भगिनींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ओवाळून राखी बांधत त्यांचे आभार मानले. तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी १ जुलैपासून करत असल्याचे सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी त्याना अनोखी ओवाळणी दिली.

विधानभवनाच्या प्रांगणात विविध क्षेत्रातील महिला भगिनी एकत्र जमल्या होत्या. विधिमंडळात सादर झालेल्या अर्थसंकल्पात महिलांसाठी अनेक निर्णय घेण्यात आले. या निर्णयामुळे राज्यतील महिलांना मोठा दिलासा मिळाल्याने त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ओवाळून राखी बांधून घेतलेल्या या निर्णयांबद्दल त्यांचे आभार मानले. 

मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, अर्थसंकल्पात राज्यातील महिला भगिनींना दिलासा देणारे अनेक निर्णय आम्ही घेतले आहेत. आम्ही घेतलेल्या मुख्यमंत्री माझी बहीण योजनेचा जीआर तातडीने काढण्याचा निर्णय आम्ही घेतला असून त्याचे लाभ येत्या १ जुलैपासून माता भगिनींना देण्यात येणार आहे. यानुसार या महिलांना दरमहा पंधराशे रुपये महिलांना मिळणार आहेत. या निर्णयाचा फायदा अडीच कोटींहुन जास्त महिलांना होणार आहे. त्यासोबत महिलांना वर्षातून ३ सिलेंडर मोफत देणाऱ्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनाही लवकरच सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, २५ लाख महिलांना लखपती दीदी बनवण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे. बचतगटांतील महिलांचे खेळते भांडवल १५ हजारांवरून वाढवून ३० हजार करण्यात आले आहे. मुलींना उच्च शिक्षणापर्यंतचे शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. १० हजार महिलाना पिंक रिक्षांचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच महिलांना मोफत प्रवास, ५० टक्क्यांपर्यंत मोफत एसटी प्रवास यापूर्वीच दिलेला आहे. या सर्व निर्णयाबद्दल या महिलांनी माझे आभार मानून मला राखी बांधल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी  शासनाचे आभार मानले.  

टॅग्स :एकनाथ शिंदेविधान भवनविधानसभा