Join us

बहादूर महिला रेल्वे पोलिसाने पाठलाग करून रंगेहाथ पकडले आरोपीला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 17:01 IST

महिला प्रवाश्याचा मोबाईल हिसकावून पळ काढत होती महिला आरोपी 

मुंबई - कुर्ला रेल्वे स्थानकात गुरुवारी महाराष्ट्र सुरक्षा बल आणि आरपीएफच्या जवानांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून एका महिला मोबाईल चोराला पकडले. जैनब पठाण असे या सराईत  महिला चोराचे नाव आहे. कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी जैनबविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

जैनब ही लोकलमधील महिलांचे मोबाईल, पर्स, पैसे आदी मौल्यवान वस्तुंची चोरी करत असे. रेल्वे पोलिसांनी तिला अटक केली असून तिच्याकडून इतर गुन्ह्यांचा छडा लागण्याची शक्यता आहे. गुरूवारी कुर्ला येथील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर लोकलमधून ज्योत्स्ना महेश जगताप ही महिला उतरली. यावेळी तिच्या हातातली मोबाईल हिसकावून जैनब पठाण पळू लागली. ही घटना पाहणाऱ्या महाराष्ट्र सुरक्षा बल आणि आरपीएफच्या जवानांनी तिचा पाठलाग केला. या महिला चोराने अगदी रेल्वे रुळापर्यंत धाव घेतली, तरी देखील तिच्यामागे या जवानांनी उडी घेत तिला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी आपला जीव धोक्यात घालून एका सराईत चोराच्या मुसक्या आवळल्या. जैनब हिला लोहमार्ग पोलिसांच्या हवाली करण्यात आले. सध्या तिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

टॅग्स :रेल्वेगुन्हादरोडामुंबई