Join us  

नायर रुग्णालयातील बाळचोरी प्रकरणी महिलेला पतीसह अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2019 2:47 AM

वाकोल्यातून घेतले ताब्यात; व्ही. एन. देसाई रुग्णालय कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे आरोपींचा प्रयत्न फसला

मुंबई : नायर रुग्णालयातून गुरुवारी संध्याकाळी पाच दिवसांचे बाळ चोरी करण्यात आल्याने खळबळ उडाली होती. बाळाची प्रकृती बरी आहे की नाही याच्या तपासणीसाठी बाळ चोरी करणारी महिला त्याला घेऊन सांताक्रुझच्या व्ही. एन. देसाई रुग्णालयात तपासणीसाठी गेली. मात्र, तेथील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे बाळाची चोरी केल्याचे उघडकीस आले. त्यामुळे अवघ्या काही तासांतच या प्रकरणी हेजल डोनाल्ड कोरिया (३७) या महिलेला अटक करत बाळाची सुखरूप सुटका करण्यात पोलिसांना यश मिळाले.

बाळ चोरीप्रकरणी हेजलला व्ही. एन. देसाई रुग्णालयातून अटक करण्यात आल्याचे वाकोला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलाश आव्हाड यांनी सांगितले. आरोपी महिला पालघरच्या कर्नाळा परिसरात पतीसह राहते. तिला एक मुलगी आहे. बाळ चोरीच्या उद्देशानेच ती नायर रुग्णालयात गेल्याचे तिने वाकोला पोलिसांना सांगितले. बाळाची आई शीतल रमेश साळवी (२८) या झोपल्याचा फायदा घेत, हेजल वॉर्र्ड क्रमांक ७ मध्ये शिरली आणि अलगद बाळाला उचलून तिने पोबारा केला. साळवी यांना जाग आली, तेव्हा बाळ गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी आरडाओरडा करत रुग्णालय प्रशासनाला याची माहिती दिली. सर्वत्र शोधाशोध करत अखेर आग्रीपाडा पोलिसांत तक्रार करण्यात आली. रुग्णालयातील सीसीटीव्ही पोलिसांनी पडताळले व बाळाला पळणाºया हेजलचे फुटेज सोशल मीडियावर व्हायरल केले.अशी अडकली पोलिसांच्या जाळ्यातच्हेजल नायर रुग्णालयातून बाळ घेऊन पळाली. मात्र, बाळाची प्रकृती बरी आहे की नाही याच्या तसेच स्वत:च्याही तपासणीसाठी ती संध्याकाळी साडेसातच्या सुमारास पतीसह बाळाला घेऊन तपासणीसाठी सांताक्रुझच्या व्ही. एन. देसाई रुग्णालयात गेली. बाळाला वॉर्ड क्रमांक ७ मध्ये दाखल करण्यात आले. या वॉर्डची जबाबदारी रात्रपाळीवर असलेल्या नर्स भक्ती तरे यांच्यावर होती. ‘११ जून, २०१९ रोजी विरारच्या घरीच बाळाला जन्म दिला असून, माझी प्रसूती मेरी नावाच्या महिलेने केली. त्यामुळे मला माझी आणि बाळाची तपासणी करायची आहे,’ असे हेजलने सांगितल्याचे तरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.च्बाळाची नाळ, तसेच महिलेची अवस्था पाहून भक्ती तरे यांना संशय आला. त्याच वेळी भक्ती यांचे पती देवेंद्र तरे यांनी फोन करून नायरमधून बाळ चोरीला गेल्याचे त्यांना सांगितले. भक्ती यांच्या सांगण्यावरून त्यांनी त्यांना सीसीटीव्ही आणि बाळाचे फोटो पाठविले. नवºयाने पाठविलेल्या बाळाच्या आणि महिलेच्या फोटोमध्ये साम्य असल्याचे लक्षात येताच भक्ती यांनी याबाबत वरिष्ठांना कळविले.च्डॉक्टरांनी हेजलची सोनोग्राफी केली असता, तिची प्रसूती झालीच नसल्याचे उघडकीस आले.

च्वॉर्डचे सुरक्षारक्षक स्रेहल देसाई आणि मनोज मलीक यांना याबाबत सतर्क करण्यात आले. हेजलच्या पतीला बाळाचे जन्मस्थान विचारले असता, त्याने ते वाडिया रुग्णालय असे सांगितले. बाळाच्या जन्मस्थानाबाबत पती, पत्नीने वेगवेगळी माहिती दिल्याने रुग्णालय प्रशासनाचा संशय बळावला.च्वरिष्ठांनी याबाबत रुग्णालयात कर्तव्यावर असलेले वाकोला पोलीस ठाण्याचे शिपाई गायकवाड यांना याबाबत सांगितले. त्यांनी हेजलची चौकशी केली असता, ती उडवाउडवीची उत्तरे देऊ लागली. नायर रुग्णालयातून बाळ चोरीचा मेसेज गायकवाड यांनाही मिळाला होताच. त्यामुळे त्यांनी याबाबत वरिष्ठांना कळविले. त्यानुसार, वाकोला पोलीस पथक महिला कर्मचाºयांसह घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी हेजलला पोलीस ठाण्यात आणले. आग्रीपाडा पोलिसांनाही याबाबत कळविण्यात आले.च्आग्रीपाडा पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बाळाला ताब्यात घेत, त्याला नायर रुग्णालयात डीएनए चाचणीसाठी पाठविले. त्यांनतर, हेजलला पोलिसी खाक्या दाखविताच तिने बाळच्या चोरीची कबुली दिली.बाळाच्या पायाचा टॅग पाहिलाच नाही!पोलिसांनी तपासलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये बाळाच्या पायाला रुग्णालयात लावलेला टॅग स्पष्टपणे दिसत होता, असे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, नायर रुग्णालयाच्या गेटवर तैनात दोन्ही सुरक्षारक्षकांचे त्याकडे लक्ष नव्हते. त्यामुळे हेजल बाळाला घेऊन रुग्णालयातून सहज बाहेर पडू शकली. या सर्व प्रकारानंतर नायर रुग्णालयातील सुरक्षायंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.हेजल नातेवाईक असल्याचा गैरसमजबाळ चोरणारी हेजल वॉर्र्ड क्रमांक ७ मध्ये आली, तेव्हा तिने तिथल्या परिचारिका, मावशी आणि रुग्णांशी गोड बोलत त्यांच्याशी मैत्री केली. कर्मचाºयांसह रुग्ण आणि प्रसूती झालेल्या महिलांसोबतही ती गप्पा मारू लागली. त्यात चोरी करण्यात आलेल्या बाळाच्या आईचाही समावेश होता. त्यामुळे ती रुग्णांपैकी कोणाची तरी नातेवाईक असेल, असे सर्वांना वाटले आणि त्याचाच फायदा हेजलने घेतला....म्हणे मुलगा हवा होता!‘मला एक मुलगी आहे, पण माझ्या पतीला मुलगा हवा होता, म्हणून मी बाळ चोरले,’ असे प्राथमिक चौकशीत हेजलने पोलिसांना सांगितल्याचे तपास अधिकाºयांचे म्हणणे आहे. मात्र, तिच्या बोलण्यात कितपत तथ्य आहे, याचा तपास आग्रीपाडा पोलीस करणार असून, हेजलला त्यांच्या ताब्यात देण्यात आल्याचे वाकोला पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले.

टॅग्स :गुन्हेगारीमुंबईपोलिस