मुंबई : दहिसरमध्ये मृतदेह सापडलेल्या महिलेवर हत्येपूर्वी लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय आहे. त्यानुसार दहिसर पोलीस चौकशी करीत आहेत.मृत महिलेच्या लिव्ह इन पार्टनरला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तिचा मृत्यू झाला तेव्हा तो हैदराबादला होता, असे त्याने तपास अधिकाऱ्यांना सांगितले आहे़ मृत्यूपूर्वी महिलेवर जबरदस्ती करण्यात आल्याचे परिस्थितीजन्य पुराव्यावरून दिसते, असे एका वरिष्ठ अधिकाºयाचे म्हणणे आहे. तिचा मृत्यू हा अपघाती नसून तिची हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यानुसार तिच्या पार्टनरची कसून चौकशी सुरू आहे.जोडीदारासह वाद झाल्यानंतर नवी मुंबईत राहणारी ही महिला दहिसरमध्ये एसआरए इमारतीत राहत होती. तिच्या अंगावर कोणत्याही जखमा आढळलेल्या नाहीत. त्यामुळे तिला नेमके कसे मारले गेले, याचा तपास सुरू आहे. रविवारी संध्याकाळी दहिसर पूर्व, जनकल्याण इमारतीच्या ७०२ क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये या महिलेचा मृतदेह आढळला होता.
दहिसरमधील ‘त्या’ महिलेवर लैंगिक अत्याचाराचा संशय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 03:32 IST