प्रेमसंबंधातून महिलेवर चाकूने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:07 IST2021-02-16T04:07:36+5:302021-02-16T04:07:36+5:30

दोघे जखमी; व्हॅलेंटाइन दिनी परळमधील घटना लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : जुन्या प्रेमसंबंधातून एकाने महिलेवर धारदार चाकूने वार केल्याची ...

A woman is stabbed in a love affair | प्रेमसंबंधातून महिलेवर चाकूने वार

प्रेमसंबंधातून महिलेवर चाकूने वार

दोघे जखमी; व्हॅलेंटाइन दिनी परळमधील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : जुन्या प्रेमसंबंधातून एकाने महिलेवर धारदार चाकूने वार केल्याची घटना परळ येथील केईएम हॉस्पिटलजवळ घडली. व्हॅलेंटाइन दिनी घडलेल्या या हल्ल्यात नमिता साबळे (बदललेले नाव, वय ३७) गंभीर जखमी झाल्या, तर झटापटीत हल्लेखोर राजेश काळे (३६, रा. कुर्ला सिग्नल ब्रिजखाली, कुर्ला पूर्व) याच्या पायाला चाकू लागला. दोघांवर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुपारच्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण हाेते.

नमिता ही कोविड कालावधीत केईएम रुग्णालयात कंत्राटी स्वरूपात कामाला आहे. काळे याच्याशी तिचे पूर्वी प्रेमसंबंध होते. १४ फेब्रुवारीला दुपारी पावणे तीनच्या सुमरास तो तिला भेटण्यासाठी रुग्णालयाजवळ, बाटलीवाला रोडवर आला. आपल्यासाेबत संबंध का ठेवत नाही, असे विचारत त्याने तिच्याशी वाद घातला. सोबत आणलेल्या धारदार चाकूने तिच्या पोटावर वार केले. झटापटीत राजूच्या पायाला चाकू लागला. तिने आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिक तेथे जमले. त्यांनी राजेशला पकडले. त्यानंतर दाेघांनाही उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर राजेशला अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

......................

Web Title: A woman is stabbed in a love affair