Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील ३४ वर्षीय महिलेवर भोंदूबाबांकडून बलात्कार; २ वर्षांपासून शारीरिक संबंध प्रस्थापित

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2021 11:10 IST

मुंबईमधील एका महिलेवर गुजरातमध्ये बलात्कार करून तिची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे

मुंबई : सिद्ध तांत्रिकाबरोबर भेटीचे प्रलोभन दाखवून एका महिलेवर बलात्कार करून तिची लुबाडणूक केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी कांदिवलीत उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन भोंदूबाबांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

कांदिवलीमध्ये राहणारी ३४ वर्षीय पीडित महिला घरगुती समस्या सोडवण्यासाठी गुजरातमधील एका पुजाऱ्याला भेटण्यासाठी गेली होती. त्याठिकाणी तिची ओळख गौतम गिरी (२६) याच्याशी झाली. जो पुजाऱ्यासाठी काम करतो.  २०१८ ते २०२० पर्यंत त्यांच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. नंतर महिलेकडून लाखो रुपये उकळले. मुख्य पुजारी प्रणव शुक्ला (४६) यानेही महिलेचे शारीरिक शोषण केले. अखेर दोन्ही भोंदूबाबांना अटक केली.

टॅग्स :लैंगिक शोषणलैंगिक छळमुंबई