आरेत बिबट्याच्या हल्ल्यात महिला जखमी; कामावरुन परतताना घडली घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2021 20:04 IST2021-08-31T20:04:01+5:302021-08-31T20:04:10+5:30
गेले काही महिने दिंडोशी न्यू म्हाडा कॉलनी,आरे येथे बिबटया येत आहे. तर गेल्या सोमवारी पहाटे ओबेरॉय मॉल समोरील शिवधाम संकुल परिसरात बिबटया आला होता

आरेत बिबट्याच्या हल्ल्यात महिला जखमी; कामावरुन परतताना घडली घटना
मुंबई-गोरेगाव पूर्व,आरे कॉलनी, प्रभाग 52, युनिट 31 मधील रहिवासी लक्ष्मी उंबरसडे ही आदिवासी महिला काल रात्री 9.30च्या सुमारास घरी परत येत असताना तीच्यवर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात सदर महिला जखमी झाली.
गेले काही महिने दिंडोशी न्यू म्हाडा कॉलनी,आरे येथे बिबटया येत आहे. तर गेल्या सोमवारी पहाटे ओबेरॉय मॉल समोरील शिवधाम संकुल परिसरात बिबटया आला होता. तर काल रात्री बिबट्याने लक्ष्मी उंबरसडे या महिलेवर हल्ला केला. येथील परिसरात बिबटयाचा होणारा वावर लक्षात घेता वन विभागाने येथे।पिंजरा लावून या बिबट्याला जेरबद।करावे अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
या हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रभाग 52 च्या भाजपा नगरसेविका प्रीती सातम या घटना स्थळी जाऊन त्यांनी सदर महिला व तिच्या कुटुंबीयांची भेट घेतली, तसेच त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला व रात्री प्रवास करताना नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन केले. याठिकाणी पथदिव्यांची व्यवस्था करण्याच्या संदर्भात अधिकाऱ्यांची सुद्धा बोलणी केली असून लवकरच त्या संदर्भात कार्यवाही होईल अशी माहिती त्यांनी दिली.