धक्कादायक! प्रियकरानं कानशिलात लगावली; प्रेयसीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2019 10:08 IST2019-12-02T10:07:37+5:302019-12-02T10:08:45+5:30
प्रियकर पोलिसांच्या ताब्यात; प्रकरणाची चौकशी सुरू

धक्कादायक! प्रियकरानं कानशिलात लगावली; प्रेयसीचा मृत्यू
मुंबई: प्रियकरानं कानशिलात लगावल्यानं प्रेयसीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मानखुर्द रेल्वे स्थानकात हा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. प्रियकरानं कानशिलात लगावल्यावर तरुणी खाली कोसळली. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
दुसऱ्या मुलाशी बोलत असल्याच्या रागातून राजू पुजारी यल्लपानं त्याची प्रेयसी सीता प्रधान (वय ३५ वर्ष) हिच्या कानशिलात लगावली. यानंतर सीता लगेचच जमिनीवर कोसळली. तिला घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. या प्रकरणी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मानखुर्द पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नितिन बोबडेंनी दिली. आम्ही सध्या शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहोत. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असून यलप्पा आमच्या ताब्यात आहे. या प्रकरणाची चौकशी सध्या सुरू आहे, असं बोबडेंनी सांगितलं.