मुंबईत उद्यानाच्या शौचालयात महिला जळाली, खून की आत्महत्या?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2023 16:09 IST2023-10-31T16:09:13+5:302023-10-31T16:09:44+5:30

मुलुंड पश्चिमेकडील वसंत गार्डनच्या शौचालयात जळालेल्या अवस्थेत महिला आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

Woman burned in park toilet in Mumbai murder or suicide | मुंबईत उद्यानाच्या शौचालयात महिला जळाली, खून की आत्महत्या?

मुंबईत उद्यानाच्या शौचालयात महिला जळाली, खून की आत्महत्या?

मुंबई-

मुलुंड पश्चिमेकडील वसंत गार्डनच्या शौचालयात जळालेल्या अवस्थेत महिला आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. स्नेहन अमित बोबडे (३४) असे महिलेचे नाव असून उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. प्राथमिक तपासात आत्महत्येचा संशय असून पोलीस अधिक तपास करत आहेत. 

मुलुंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोबडे ही ठाण्याच्या रघुनाथ नगर येथे पतीसोबत राहण्यास होती. ती खासगी नोकरीला होती. रविवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास शौचालयातून धूर येत असल्याची माहिती सुरक्षा रक्षकाला मिळाली. त्याने शौचालयात धाव घेताच महिला जळालेल्या अवस्थेत दिसून येताच त्यांनी आग विझवून महिलेला अग्रवाल रुग्णालयात दाखल केले. रात्री पावणे अकराच्या सुमारात त्यांना मृत घोषित करण्यात आले. 

...म्हणून ती महिला उद्यानात आली
>> वसंत गार्डनमधील सुरक्षा रक्षक आनंद राजेंद्र मिश्रा तसेच मृत महिलेचा पती अमित शंकर बोबडे यांचा सविस्तर जबाब नोंद करण्यात आला आहे.
>> घरी वाद झाल्यानंतर महिला येथील उद्यानात येत असल्याचे समजते. ही हत्या की आत्महत्या याबाबत मुलुंड पोलीस अदिक तपास करत आहेत. याप्रकरणी अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Woman burned in park toilet in Mumbai murder or suicide

टॅग्स :Mumbaiमुंबई