Will the winter session of the Legislature be held in Mumbai instead of Nagpur this year? | विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन यंदा नागपूरऐवजी मुंबईत होणार?

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन यंदा नागपूरऐवजी मुंबईत होणार?

- यदु जोशी

मुंबई :   विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन यंदा नागपूरऐवजी मुंबईत होणार असून या बाबतचा औपचारिक निर्णय लवकरच घेण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. अधिवेशन मुंबईतच घ्यावे असा सूर राज्य मंत्रिमंडळाच्या गुरुवारच्या बैठकीत निघाला.
मंत्रिमंडळ बैठकीत नागपूर अधिवेशनाबाबत चर्चा झाली. कोरोनाचे संकट अजूनही कायम आहे. कोरोनाची दुसरी लाट डिसेंबरमध्ये येऊ शकते असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अशावेळी गर्दी टाळणे, सोशल डिस्टंन्सिग राखणे जरुरी आहे. नागपुरात अधिवेशन घेतले तर संपूर्ण यंत्रणा काही दिवसांसाठी नागपुरात हलवावी लागेल. प्रत्यक्ष अधिवेशनात कर्मचारी, अधिकारी, पत्रकार, नेते, कार्यकर्त्यांची गर्दी होऊन सोशल डिस्टंन्सिगचा बोजवारा उडेल, असे मत बहुतेक मंत्र्यांनी व्यक्त केले.
नागपूरचे एक कॅबिनेट मंत्री अधिवेशन घेण्याबाबत आग्रही होते. अधिवेशन घेतले नाही तर ‘मेसेज’ चांगला जाणार नाही असे त्यांचे म्हणणे होते. मंत्रिमंडळाचा हा सूर लक्षात घेता आता हिवाळी अधिवेशन नागपुरात होण्याची शक्यता नाही. अर्थात विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत काय ठरते ते महत्त्वाचे असेल. येत्या दोनतीन दिवसांत समितीची बैठक होण्याची शक्यता आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Will the winter session of the Legislature be held in Mumbai instead of Nagpur this year?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.