Join us

एसटीच्या कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांचा पगार देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 01:36 IST

महसूल यंत्रणेकडून एसटी कामगारांना पूरग्रस्त असल्याचा प्रमाणपत्र मिळाल्यास त्यांना आगाऊ पगार दिला जाईल

मुंबई : पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण येथील भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. या पूरस्थितीमुळे नुकसान झालेल्या एसटी कामगारांना तीन महिन्यांचे वेतन देण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, कराड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड व इतर ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्याने एसटी कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे ज्या कर्मचाºयाचे पूरस्थितीमुळे नुकसान झाले असेल, अशा कर्मचाºयांनी विभाग प्रमुखाकडे आगाऊ पगारासाठी अर्ज करावा. पुरामुळे झालेल्या नुकसानीचा तपशील संपूर्ण देण्यात यावा.महसूल यंत्रणेकडून एसटी कामगारांना पूरग्रस्त असल्याचा प्रमाणपत्र मिळाल्यास त्यांना आगाऊ पगार दिला जाईल. हा आगाऊ पगार सलग ३६ महिने हप्त्यातून वसूल केला जाईल, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली.

विशेष रजा मंजूर करण्याची मागणीकोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड येथील एसटी विभागाला सर्वात जास्त फटका बसला. या विभागातून एसटी न चालविण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला. त्यामुळे एसटी कर्मचारी कर्तव्यासाठी डेपोत येऊनसुद्धा त्यांना कर्तव्य बजावता आले नाही. यासह काही कर्मचाºयांना पुरस्थितीमुळे कर्तव्यावर पोहोचू शकले नाही, अशा कर्मचाºयांना विशेष रजा मंजूर करावी, अशी मागणी एसटी कामगार संघटनेच्या वतीने केली जात आहे.

टॅग्स :एसटी