वीज दरवाढीचा बोजा जनतेवर पडू देणार नाही; देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2023 06:46 AM2023-03-14T06:46:33+5:302023-03-14T06:47:14+5:30

जनतेवर वीज दरवाढीचा भुर्दंड पडणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

will not allow the burden of electricity price hike to fall on the public devendra fadnavis information in the legislative assembly | वीज दरवाढीचा बोजा जनतेवर पडू देणार नाही; देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती

वीज दरवाढीचा बोजा जनतेवर पडू देणार नाही; देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: महावितरणने राज्य वीज नियामक आयोगाकडे ३७ टक्के वीज दरवाढ मागितल्याची चर्चा निष्फळ असून त्यांनी १० ते ११ टक्के वीज दरवाढ मागितली आहे. एवढीही दरवाढ होऊ नये असा प्रयत्न असून राज्य सरकार त्यासंदर्भात नियामक आयोगाकडे भूमिका मांडेल. जनतेवर वीज दरवाढीचा भुर्दंड पडणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत दिली. लक्षवेधीला उत्तर देताना ते बोलत होते.

महावितरणने राज्य वीज नियामक आयोगाकडे ३७ टक्के वीज दरवाढीची मागणी केल्याने जनतेमध्ये चिंतेचे वातावरण असल्याचा मुद्दा समाजवादी पक्षाचे आमदार आबू आझमी यांनी विधानसभेत उपस्थित केला होता. त्याला फडणवीसांनी उत्तर दिले. पूर्वी राज्य वीज नियामक आयोगाकडे दरवर्षी दरवाढीबाबत याचिका दाखल व्हायची. मात्र आता ३ ते ४ वर्षांनी ती केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य वीज नियामक आयोगाकडे तोफ मागितली तर ते रिव्हॉल्व्हर देतात असे गमतीने सांगत महावितरणची वीज दरवाढीची मागणी आयोग मान्य करणार नाही, यासाठी सरकारही लक्ष घालेल.  

कोळसा महागला

राज्यात कोळशाच्या प्रकल्पातून वीज मोठ्या प्रमाणात येते. कोळशाचा भाव दोन पटीने वाढल्याने होणारे नुकसानही कुठून तरी भरले पाहिजे. अन्यथा महावितरण अडचणीत येईल, त्यामुळे कमीत कमी बोजा जनतेवर पडेल असा आमचा प्रयत्न राहील हा विश्वास फडणवीसांनी दिला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: will not allow the burden of electricity price hike to fall on the public devendra fadnavis information in the legislative assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.