Join us
Daily Top 2Weekly Top 5

काजू उद्योगाला व्हॅट परतावा देणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2020 06:02 IST

काजू उद्योगाला व्हॅटचा परतावा देण्याबाबत तसेच काजूपासून तयार होणाऱ्या फेणीला करसवलत देण्याबाबत राज्यशासन सकारात्मक निर्णय घेईल,

मुंबई : काजू उद्योगाला व्हॅटचा परतावा देण्याबाबत तसेच काजूपासून तयार होणाऱ्या फेणीला करसवलत देण्याबाबत राज्यशासन सकारात्मक निर्णय घेईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज महाराष्ट्र काजू उत्पादनक संघटनेच्या प्रतिनिधींना दिला.संघटनेचे अध्यक्ष सुरेश बोवलेकर यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधींनी आज उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी कोकणातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आपण नेहमीच सकारात्मक राहिलो असून काजू उत्पादक शेतकरी हे कोकणच्या विकासात महत्वाची भूमिका बजावत आहेत. त्यांना आपले नेहमीच सहकार्य राहिल, असे ते म्हणाले.

टॅग्स :अजित पवार