Join us  

भटक्या समाजाला नागरिकत्व मिळेल का? पवारांचा मोदी सरकारला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 6:02 PM

सीएए आणि एनआरसीवरुन सध्या देशात वादंग सुरू आहे.

मुंबई - काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेसने सीएए आणि एनआरसीला विरोध केला आहे. तसेच, या दोन्ही कायद्यांविरोधातील आंदोलनातही राष्ट्रवादीने सहभाग घेतला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड हेही मुंबईतील आंदोलनात सहभागी झाले होते. शरद पवारा यांनीही याबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केलीय. तसेच, आपल्या देशात भटका समाज आहे, त्यांना नागरिकत्व मिळेल का? असा सवाल पवार यांनी केला आहे. 

सीएए आणि एनआरसीवरुन सध्या देशात वादंग सुरू आहे. त्यातच, पाकिस्तानातील त्रासामुळे भारतात पतणाऱ्या लोकांना संरक्षण देण्याचे काम करणाऱ्या बलुचिस्तान हिंदू पंचायतीने नागरिकता संशोधन कायद्याचे समर्थन केले आहे. तसेच या कायद्याच्या समर्थनासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. हा कायदा धर्मनिरपेक्षतेच्या विरुद्ध नाही. पाकिस्तान, अफगानिस्तान आणि बांग्लादेशमध्ये मुस्लीम अल्पसंख्यांक नाही. त्यामुळे त्यांच्यावर तिथे अत्याचारही होत नाही असे या याचिकेत नमूद आहे. सुप्रिम कोर्टाने तुर्तात यावर सुनावणी नकार दिला आहे. तर, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या अल्पसंख्याक सेलच्या बैठकीत एनआरसीचा विरोध स्पष्ट केलाय. 

केंद्र सरकारचे आज समाजातील पिछडलेल्या वर्गाकडे लक्ष नाही. या वर्गासाठी परिवर्तन करण्याचे काम आपण केले पाहिजे. ज्यांच्या हाती देशाची सत्ता आहे ते ठराविक समाजाचा विचार करून निर्णय घेण्याचे काम करत आहेत. बहुसंख्य लोकांना याची जाणीव नाही.क्रिकेट क्षेत्रात काम करत असताना मी पाकिस्तानमध्ये बैठकीला गेलो होतो. तेव्हा असे अनेक लोक मला भेटले की त्यांचा एकतरी नातेवाईक भारतात आहे. त्यांची मनापासून इच्छा आहे की, त्यांच्या नातेवाईकांसोबत भेटीगाठी व्हाव्यात. पण केवळ ते मुस्लिम आहेत म्हणून त्यांना भारतात येण्यास परवानगी नाही, असे पवार यांनी सांगितले. तसेच, जनगणनेत प्रत्येकाच्या जन्माची नोंद करण्याचा निर्णय होत आहे. जन्म झालेल्या गावाची देखील नोंद होईल असे पाहण्यात येत आहे. पण जो भटका समाज आहे त्याच्या जन्माची कोणती नोंद असेल का? त्याला भारतीय नागरिकत्व मिळेल का? असा प्रश्नही पवार यांनी उपस्थित केला आहे. तसेच, असे न झाल्यास त्या नागरिकांवर अन्याय होणार आहे. 

टॅग्स :शरद पवारनागरिकत्व सुधारणा विधेयकभाजपाराष्ट्रवादी काँग्रेस