मुंबई : बेस्ट बस आगार, बस स्थानके आणि बसथांब्यांच्या परिसरात होणाऱ्या चित्रपट, मालिका आणि जाहिरातींच्या चित्रीकरणासाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कात वाढ करण्याचा प्रस्ताव बेस्ट प्रशासनाने तयार केला आहे. यासोबतच चित्रीकरणाशी संबंधित वाहनांसाठी आकारण्यात येणाऱ्या पार्किंग शुल्कातही वाढ करण्याचे प्रस्तावित आहे. सुधारित दर १ एप्रिल २०२६ ते ३१ मार्च २०३० या पाच वर्षांच्या कालावधीसाठी लागू करण्याचा प्रस्ताव असून दरवर्षी सुमारे १० टक्क्यांनी शुल्क वाढवण्याची तरतूद करण्यात आली आहे.
बेस्टच्या वाहतूक नियोजन विभागाने तयार केलेल्या या प्रस्तावानुसार बस आगार, बसस्थानक आणि बसथांबे परिसरात चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, जाहिराती किंवा इतर चित्रीकरणासाठी प्रतिदिन आकारण्यात येणारे शुल्क तसेच सुरक्षा अनामत ठेव रक्कम सुधारित करण्याचा प्रस्ताव आहे.
चित्रीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर उपकरणे, लायटिंग यंत्रणा आणि तांत्रिक पथकासह वाहने येत असल्याने या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग शुल्क आकारण्याची तरतूदही प्रस्तावात केली आहे. चित्रीकरणासाठी येणाऱ्या वाहनांमध्ये लायटिंग व्हॅन, जनरेटर व्हॅन, उपकरणे वाहून नेणारे ट्रक किंवा टेम्पो तसेच कलाकारांच्या कार यांचा समावेश असतो. या वाहनांना ‘पे अँड पार्क’चे सामान्य दर लागू होणार नाहीत. तर त्यांना स्वतंत्र वार्षिक पार्किंग शुल्क आकारले जाणार आहे.
नोंदणी रद्द केल्यास...
चित्रीकरणासाठी आगार परिसर आरक्षित केल्यास त्या शुल्कात संबंधित वाहनांच्या पार्किंगचा समावेश असेल. मात्र आगार परिसर आरक्षित नसल्यास पार्किंगसाठी स्वतंत्र शुल्क आकारले जाईल, असेही प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. चित्रीकरणाची नोंदणी रद्द केल्यास रद्द शुल्क आकारण्याची तरतूदही करण्यात आली आहे. चित्रीकरणाच्या तारखेत बदल करायचा असल्यास किमान तीन दिवस आधी बेस्ट प्रशासनाला कळविणे बंधनकारक राहणार आहे.
वाहतूक व्यवस्था, सुरक्षेची जबाबदारी निर्मिती संस्थेवर
चित्रीकरणादरम्यान परिसरातील वाहतूक व्यवस्था, सुरक्षा तसेच संबंधित वाहनांचे संरक्षण याची जबाबदारी संबंधित निर्मिती संस्थेची राहणार असून सर्व वाहनांचा वैध विमा असणे आवश्यक असल्याची अटही घालण्यात आली आहे. दरम्यान, या सुधारित शुल्क प्रस्तावाला बेस्ट समितीची मान्यता मिळाल्यानंतर तो अंतिम मंजुरीसाठी मुंबई महापालिकेकडे पाठविण्यात येणार आहे. मंजुरी मिळाल्यानंतरच नव्या शुल्काची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
असे आहे प्रस्तावित प्रति दिन शुल्क (रुपयांत)
वर्ष आगार स्थानक बसथांबे२०२५-२६ ३,९९,४३५ २,१३,९८४ ९९,८६१२०२६-२७ ४,३९,३७८ २,३५,३८२ १,०९,८४७२०२७-२८ ४,८३,३१६ २,५८,९२० १,२०,८३२२०२८-२९ ५,३१,६४८ २,८४,८१२ १,३२,९१५२०२९-३० ५,८४,८१३ ३,१३,२९३ १,४६,२०६
Web Summary : BEST proposes a 10% annual fee hike for film shoots at depots, stations, and stops, starting April 2026. Parking fees for film-related vehicles will also increase. Production houses are responsible for traffic, security, and vehicle insurance during filming. The proposal awaits final approval from the Mumbai Municipal Corporation.
Web Summary : बेस्ट ने डिपो, स्टेशनों और स्टॉप पर फिल्म शूटिंग के लिए 10% वार्षिक शुल्क वृद्धि का प्रस्ताव रखा है, जो अप्रैल 2026 से शुरू होगा। फिल्म से संबंधित वाहनों के लिए पार्किंग शुल्क भी बढ़ेगा। फिल्मांकन के दौरान यातायात, सुरक्षा और वाहन बीमा की जिम्मेदारी प्रोडक्शन हाउस की होगी। प्रस्ताव को मुंबई नगर निगम से अंतिम मंजूरी का इंतजार है।