मुंबईत अधिवेशनाने कोरोना होणार नाही का?; सुधीर मुनगंटीवार यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2020 00:48 IST2020-11-13T00:47:59+5:302020-11-13T00:48:09+5:30
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत नागपूर विभागातून भाजपचे उमेदवार संदीप जोशी यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज सादर केला.

मुंबईत अधिवेशनाने कोरोना होणार नाही का?; सुधीर मुनगंटीवार यांचा सवाल
नागपूर : कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून नागपुरातील हिवाळी अधिवेशन मुंबईला हलवण्यात आले. नागपुरात अधिवेशन असेल तर कोरोना होईल आणि मुंबईत अधिवेशन घेतल्याने कोरोना होणार नाही का, असा रोखठोक सवाल राज्याचे माजी अर्थमंत्री व लोकलेखा समितीचे अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी येथे केला.
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत नागपूर विभागातून भाजपचे उमेदवार संदीप जोशी यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी त्यांच्यासोबत मुनगंटीवार प्रामुख्याने उपस्थित होते. अर्ज भरून झाल्यावर पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी नागपुरातील अधिवेशन मुंबईला हलवण्यात आल्याबाबत पत्रकारांनी विचारले असता त्यांनी उपरोक्त सवाल केला.