Join us  

Narayan Rane: राणेंच्या वक्तव्याचं भाजपा समर्थन करणार का? हे स्पष्ट शब्दात सांगावं; जयंत पाटील यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 12:46 PM

नारायण राणे यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांबाबत अशा खालच्या पातळीवर जाऊन बोलणं हे महाराष्ट्र केव्हाही मान्य करणार नाही.

नारायण राणे यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांबाबत अशा खालच्या पातळीवर जाऊन बोलणं हे महाराष्ट्र केव्हाही मान्य करणार नाही. राणेंनी केलेल्या विधानाचं भाजपा समर्थन करणार का? हे देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट शब्दात सांगावं, असं आवाहन राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे. 

नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. ठिकठिकाणी शिवसैनिक आक्रमक झाले असून जोरदार आंदोलनं सुरू आहेत. मुंबईत राणे समर्थक आणि युवासेना कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाल्याचंही पाहायला मिळत आहे. राज्यातील याच तणावाच्या वातावरणाबाबत जयंत पाटील यांना विचारण्यात आलं असताना त्यांनी शिवसैनिकांकडून अॅक्शनला रिअॅक्शन येत आहे. कायदा हातात घेण्याचं समर्थन राष्ट्रवादी काँग्रेस कधीच करणार नाही. पण राज्याच्या मुख्यमंत्र्याबाबत असं वक्तव्य राज्याच्या राजकारणात आजवर कधी कुणी केलेलं नाही. ही राज्याच्या सुसंस्कृत राजकारणाला शोभणारं नाही. राणेंनी केलेलं विधान अतिशय दुर्दैवी आहे. त्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे, असं जयंत पाटील म्हणाले. 

चंद्रकांत पाटलांचं जास्त मनावर घेऊ नकाचंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांनी याआधी केलेली भाषणं काढून पाहावीत, असं विधान केलं. त्याबाबत विचारण्यात आलं असताना चंद्रकांत पाटील यांना जास्त मनावर घेऊ नका, त्यांच्यामुळे टीआरपी मिळणार नाही, असा खोचक टोला जयंत पाटील यांनी लगावला. 

टॅग्स :नारायण राणे भाजपाजयंत पाटील