Will 2 rupees clean water be stopped at the western railway station? Contractors not ready to pay bills | रेल्वे स्थानकांवरील 2 रुपयांत शुद्ध पाणी बंद होणार? ठेकेदारांनी बिले थकविली

रेल्वे स्थानकांवरील 2 रुपयांत शुद्ध पाणी बंद होणार? ठेकेदारांनी बिले थकविली

मुंबई : रेल्वे स्थानकांवरील 2 रुपयांत 300 मिली शुद्ध आरओ पाणी केंद्रे बंद होण्याच्या मार्गावर आहे. वॉटर व्हेंडिंग मशीन (WVM) ला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत होता. मात्र, ठेकेदारांना ही सेवा महागडी वाटू लागली आहे. आयआरसीटीसीने शुक्रवारी पत्र लिहून पश्चिम रेल्वेवरील 23 स्थानकांवरील डब्ल्यूव्हीएम सेवा बंद झाल्याचे सांगितले आहे. यामध्ये मुंबईतील काही उपनगरीय स्थानकेही आहेत. 


आयआरसीटीसीनुसार हाय टेक स्वीट वॉटर टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडने रेल्वेद्वारे दिली जाणारी पाणी आणि विजेची बिले अदा केलेली नाहीत. या कंपनीने प्रवाशांद्वारे तक्रार केल्यानंतर आयआरसीटीसीकडून केल्या जाणाऱ्या दंडाची रक्कमही भरलेली नाही. या कंपनीद्वारे मुंबई विभागात 39 ठिकाणी शुद्ध पाण्याची सेवा देण्यात येत होती. जी आता बंद झाली आहे. 


आयआरसीटीसीने कंपनीद्वारे असमर्थता दाखविण्यात आल्यानंतर रेल्वेला कळविले आहे. या कंपनीद्वारे जोपर्यंत बिल भरले जात नाही तेपर्यंत कोणतीही पाणी शुद्धीकरण मशीन किंवा त्याचा सुटा भागही न्यायला देऊ नये, असे सांगण्यात आले आहे. याचाच अर्थ जोपर्यंत या बिलाची रक्कम भरली जात नाही तोपर्यंत नवीन सेवा पुन्हा सुरू होणे अशक्य आहे. हे प्रकरण संपेपर्यंत प्रवाशांना कमी किंमतीतले शुद्ध पाणी मिळणे दुर्लभ होणार आहे. तर अन्य कंपन्यांद्वारे देण्यात येणारी सेवा सुरू राहणार आहे. 

Web Title: Will 2 rupees clean water be stopped at the western railway station? Contractors not ready to pay bills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.