पतीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2020 04:36 IST2020-02-23T04:36:24+5:302020-02-23T04:36:35+5:30
अंत्यसंस्कार करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न

पतीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक
मुंबई : प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या आणि अंत्यसंस्कार करून पुरावे मिटविणाऱ्या महिलेला अखेर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कक्ष ८ ने शनिवारी अटक केली.
उज्ज्वला पटेल (३५) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. मालाडच्या मढ परिसरातील पास्कल वाडीमध्ये ती राहात होती. तिचा पती महेश याची तिने प्रियकराच्या मदतीने हत्या केली. पोलीस तिच्या मागावर होते. मात्र, ती पोलिसांना गुंगारा देत होती. कक्ष ८ चे प्रमुख अजय जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी सहा वाजता तिच्या घराकडे सापळा रचला. शिताफीने तिला अटक करण्यात आली.
प्रियकर अरुप दास (२५) आणि त्याला मदत करणारा रिक्षाचालक सागर शर्मा (२८) यांना शुक्रवारीच पोलिसांनी अटक केलीे. दाससोबत असलेल्या प्रेमसंबंधामुळे महेशसोबत उज्ज्वलाचे भांडण व्हायचे. अखेर तिने दाससोबत मिळून महेशचा काटा काढला आणि कोणाला समजू नये, म्हणून त्याचे अंत्यसंस्कारही उरकले.