आपले नवीन वर्षाचे संकल्प पूर्ण का होत नाहीत? हे आहे कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 15:30 IST2025-01-06T15:28:46+5:302025-01-06T15:30:04+5:30

नव्या वर्षाच्या सुरुवातीला अनेकजण संकल्प करत असतात. मात्र, बहुतांश लोकांचे महिनाभरातच हे संकल्प मोडतात

Why don't our New Year's resolutions come true These are the big reasons | आपले नवीन वर्षाचे संकल्प पूर्ण का होत नाहीत? हे आहे कारण...

आपले नवीन वर्षाचे संकल्प पूर्ण का होत नाहीत? हे आहे कारण...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई :  नव्या वर्षाच्या सुरुवातीला अनेकजण दैनंदिन जीवनशैली, कामकाज याविषयी विविध संकल्प करत असतात. मात्र, बहुतांश लोकांचे महिनाभरातच हे संकल्प मोडतात. अनेकदा सर्वकाही नियोजन करूनही ते पूर्णत्वास जात नाही, अशी अनेक उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात.

संकल्प का तुटतात याविषयी मानसोपचारतज्ज्ञ अनेक कारणे सांगतात. संकल्प करताना  छोटी छोटी उद्दिष्टे ठेवत मोठ्या संकल्पाची तयारी करणे अपेक्षित आहे. तसेच संकल्प करण्यासाठी प्रेरणा महत्त्वाची असते. संकल्पांना ध्येयाची धार नसते. संकल्प आणि ध्येय दोन वेगळ्या गोष्टी आहेत. ध्येयासाठी माणूस झपाट्याने काम करतो. कारण त्या व्यक्तीसाठी ध्येय महत्त्वाचे असते. संकल्प हा आयुष्यात अतिरिक्त भर पाडण्यासाठी केलेला असतो. तो पूर्ण झाला तर ठीक, नाही झाला तर काही फरक पडत नाही, अशी अनेकांची धारणा असते.

ही आहेत कारणे...

सारासार विचार न करता निश्चय करणे. 
कित्येकदा सगळे संकल्प करतात म्हणून काहीही ठरविणे.  
क्षमता, उद्दिष्ट, कौशल्य, प्राधान्य यांचा विचार न करता अवास्तव मागणीचा संकल्प करणे. 

काय कराल?

  • संकल्प करताना तो शक्यतो आवाक्याबाहेरचा करू नये.
  • स्वतःचे बलस्थान, कमतरतांचा विचार करून संकल्प करावा.  
  • संकल्प पूर्ण करण्यासाठी ध्येय निश्चित करावे. 
  • अचूक नियोजन हवे. 
  • सातत्याने करता येतील असे सोपे संकल्प करावेत.


आपण पाहतो अनेकांनी  जे संकल्प केलेले असतात ते पूर्णत्वास जात नाहीत. ते मध्येच मोडतात. कारण संकल्पाला ध्येयाची धार नसते. त्यामुळे त्याकडे गांभीर्याने बघितले जात नाही. संकल्प पूर्ण नाही झाला तर काय फरक पडतो, अशी मानसिकता बळावलेली असते, तसेच तो पूर्ण करण्यासाठी प्रेरणा आवश्यक असते ती नसते. मात्र, शिस्तबद्ध नियोजन केल्यास संकल्प पूर्ण होत असल्याचेसुद्धा अनेक उदाहरणे आहेत.
- डॉ. सारिका दक्षीकर, मानसोपचार विभागप्रमुख, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई.

Web Title: Why don't our New Year's resolutions come true These are the big reasons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.