"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 13:15 IST2025-12-26T13:15:07+5:302025-12-26T13:15:35+5:30
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही? ...अरे मुंबई काय कुणाच्या बापाची जाहगीर आहे का?"

"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
सध्या राज्यातील सर्वच पक्ष कमरेला लंगोट लाऊन, शड्डू ठोकत महानगरपालिका निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. या महापालिका निवडणुकीच्या संग्रामात केंद्र स्थानी आहे ती मुंबई महानगरपालिका. मुंबई महानगरपालिकेचा महापौर कोण होणार? यावरून आता चांगलीच चर्चा रंगली आहे. यातच, "मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही? ...अरे मुंबई काय कुणाच्या बापाची जाहगीर आहे का?", असा सवाल एआयएमआयएमचे (AIMIM) नेते वारीस पठाण यांनी केला आहे.
यासंदर्भात विचारले असता, शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्टच उत्तर दिले. ते मुंबईत पत्रकारांसोबत बोलत होते.
काय म्हणाले संजय राऊत? -
यासंदर्भात बोलताना राऊत म्हणाले, "आम्ही मुस्लीम राष्ट्रपती केला होता, हे हे लोक विसरले. आम्ही मुस्लीम राष्ट्रपती केला आहे आणि भारतीय जनात पक्षाच्या सरकारमध्ये तर, मुस्लीम राज्यपालही होत आहेत. असं नाही ना... देशात किती मुस्लीम राष्ट्रपती झाले आहेत, भाजपनेही केले आहेत. डॉ. अब्दुल कलाम, झाकिर हुस्सेन, फखरुद्दीन अली अहमद, किती मुस्लीम राष्ट्रपती केले आहेत. सोडा चला..."
नेमकं काय म्हणाले होते पठाण...? -
वारीस पठाण म्हणाले होते, "मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही? संविधानात तर समानता आहे ना? सर्वांना बरोबरीचा दर्जा, हे संविधान वाचत नाहीत, यांना काही माहिती नाही. यांचे केवळ एकच काम आहे, द्वेश पसरवणे, धृविकरण करणे आणि मुस्लिमांना कुठल्याही पद्धतीने शिव्या देणे. यांच्याकडे विकासाचे काही मुद्देच नाहीयेत. यांना विकासासंदर्भात प्रश्नविचारा, उत्तर देणार नाही. महाराष्ट्रात एवढे शेतकरी आत्महत्या करत आहेत, त्यांना पॅकेज केव्हा देणार? प्रश्न विचारा, यांच्याकडे उत्तर नाही. महाराष्ट्रात भ्रष्टाचार वाढलाय, यासंदर्भातही त्यांच्याकडे उत्र नाही, ठेकेदारांवर काही कारवाई नाही. यांच्याकडे कुठल्याही प्रश्नाचे उत्तर नाही. केवळ एकच गोष्ट धृविकरण, मुंबईचा महापौर... 'जिसको मुंबई में रहणा है, ये कहना है,' अरे मुंबई काय कुणाच्या बापाची जाहगीर आहे का? मुंबई सोडा म्हणणारे तुम्ही कोण? असा प्रश्न वारीस पठाण यांनी उपस्थित केला होता. याचा व्हिडिओ त्यांनी त्यांच्या फेसबूक पेजवरही अपलोड केला आहे.