विधानसभेत वाढलेले १० लाख मतदार पालिकेत कोणाच्या बाजूने जाणार? नवी मतदार यादी जाहीर झाली, तर आणखी ५० हजार मतदार वाढण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 13:15 IST2025-06-12T13:14:48+5:302025-06-12T13:15:08+5:30

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुंबईत १० लाख मतदार वाढले होते. त्यावरून राजकीय गदारोळ सुरू असताना आता निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईपर्यंत जर नवीन मतदार यादी आली तर विधानसभेला वाढलेले मतदार कमी होणार की त्यात आणखी वाढ होणार, यावरून राजकीय चर्चांना ऊत आला आहे.

Who will the 10 lakh voters who have increased in the Legislative Assembly vote for in the municipality? | विधानसभेत वाढलेले १० लाख मतदार पालिकेत कोणाच्या बाजूने जाणार? नवी मतदार यादी जाहीर झाली, तर आणखी ५० हजार मतदार वाढण्याची शक्यता

विधानसभेत वाढलेले १० लाख मतदार पालिकेत कोणाच्या बाजूने जाणार? नवी मतदार यादी जाहीर झाली, तर आणखी ५० हजार मतदार वाढण्याची शक्यता

मुंबई - नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुंबईत १० लाख मतदार वाढले होते. त्यावरून राजकीय गदारोळ सुरू असताना आता निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईपर्यंत जर नवीन मतदार यादी आली तर विधानसभेला वाढलेले मतदार कमी होणार की त्यात आणखी वाढ होणार, यावरून राजकीय चर्चांना ऊत आला आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीला मुंबईत वाढलेले १० लाख मतदार महापालिकेत कोणाच्या बाजूने जाणार, याची चर्चा आता सुरू झाली आहे.

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत प्रभागांची संख्या २०१७ प्रमाणेच २२७ राहणार आहे. मात्र, २०१७च्या तुलनेत मुंबईतील मतदारांची संख्या जवळपास १० लाखांनी वाढली आहे. परिणामी, प्रत्येक प्रभागात जवळपास पाच हजार मतदार वाढतील.

मे २०२४ मध्ये देशात सार्वत्रिक लोकसभा निवडणूक झाली. त्यानंतर सहा महिन्यांत विधानसभा निवडणूक पार पडली. तर मुंबई महापालिकेची शेवटची निवडणूक २०१७ मध्ये झाली. त्यावेळी मतदार संख्या ९१ लाख ८० हजार ६५३ इतकी होती. मुंबईतील प्रत्येक प्रभाग हा साधारण ५०,००० लोकसंख्या गृहीत धरून २२७ मध्ये विभागाला गेला. आता प्रभागांची संख्या तेवढीच राहणार असल्याने वाढीव लोकसंख्या आणि मतदार या २२७ मध्ये विभागाला जाईल, अशी माहिती एका महापालिका अधिकाऱ्याने दिली.

मतदार यादीत नावनोंदणी व नाव काढण्याची प्रक्रिया सतत चालू असते.
आगामी पालिका निवडणुकीसाठी नुकत्याच झालेल्या विधानसभेची मतदार यादी उपलब्ध आहे.
निवडणूक कार्यक्रम जाहीर  झाल्यावर नवीन मतदार यादी प्रसिद्ध झाली तर ती  विचारात घेता येऊ शकते. 

सहा महिन्यांपूर्वी म्हणजेच नोव्हेंबर २०२४ मध्ये विधानसभा निवडणुकीच्यावेळी मतदार नोंदणी अद्ययावत करण्यात आली. त्यावेळी मुंबईतील एकूण मतदार संख्या १ कोटी २ लाख २९ हजार ७०८ इतकी होती. २०१७च्या तुलनेत (आठ वर्षांत) ही १० लाख ४९ हजार ५५ इतकी वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, पुढील चार ते पाच महिन्यांत त्यात साधारण ५० हजारांची भर पडल्यास एकूण ११ लाख वाढीव मतदार या महापालिका निवडणुकीत पात्र हाेऊ शकतात. 
नोव्हेंबर २०२४ नुसार, मुंबईत १,०२,२९,७०८ नोंदणीकृत मतदार होते. यामध्ये मुंबई शहरातील २५,४३,६१० आणि उपनगरीय जिल्ह्यामधील ७६,८६,०९८ मतदारांचा समावेश होता. यात ५४,६७,३६१ पुरुष मतदार, ४७,६१,२६५ महिला मतदार आणि १,०८२ तृतीयपंथी मतदारांचा समावेश होता.

Web Title: Who will the 10 lakh voters who have increased in the Legislative Assembly vote for in the municipality?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.