येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 06:58 IST2025-11-07T06:57:27+5:302025-11-07T06:58:44+5:30
विविध पक्षांना आरक्षणनिहाय उमेदवाराचा शोध घेण्यासाठी करावी लागणार कसरत

येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष लागलेल्या मुंबई पालिका निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला वांद्रे येथील बालगंधर्व सभागृहात सकाळी ११ वाजत होईल. या सोडतीवर सर्वपक्षीय माज नगरसेवक व इच्छुक उमेदवार यांन भवितव्य अवलंबून आहे. वॉर्ड आरक्षप बदलल्यास अनेक वर्षे विकासकाम केलेल्या माजी नगरसेवकांना इत वॉर्डाचा शोध घ्यावा लागणार आहे, तसेच विविध पक्षांना आरक्षणनिहाय उमेदवाराचा शोध घेण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.
अनुसूचित जाती (महिला अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांच मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासव प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण महिलांसाठी प्रभागांचे आरक्षण निश्चि करण्यासाठी सोडत काढण्यात येईल त्यानंतर १४ नोव्हेंबरला आरक्षणाच प्रारूप प्रसिद्ध होईल. २० नोव्हेंबरल दुपारी ३ वाजेपर्यंत आरक्षण प्रारूपाता हरकती व सूचना सादर करता येतील त्या विचारात घेऊन आरक्षणाची अंति अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल ११ नोव्हेंबरला आरक्षण सोडती कोणाचा वॉर्ड जाणार, कोणाचा राहणान याची धाकधूक माजी नगरसेवकांन लागली आहे. तर, सर्वपक्षीय इच्छुक उमेदवार आरक्षण सोडत जाहीर झाल्यापासून निवडणुकीच्या तयारीला लागतील.
...असे असेल आरक्षण
पालिकेच्या २२७ जागांपैकी, अनुसूचित जाती (१५), अनुसूचित जमातीसाठी (२), इतर मागासवर्गीयांसाठी (६१) जागा, तर उर्वरित जागा खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित असतील. यात सर्व मिळून महिलांसाठी ५० टक्के म्हणजेच ११४ महिलांसाठी आरक्षित असणार आहेत.