मुंबईचे खासदार कोण होणार?, मतदारांमध्ये उत्सुकता

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 01:53 AM2019-04-29T01:53:01+5:302019-04-29T06:05:05+5:30

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांसाठी सोमवारी मतदान पार पडणार आहे. यासाठी प्रशासनातर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे

Who will be the Mumbai MP?, Curiosity among the voters | मुंबईचे खासदार कोण होणार?, मतदारांमध्ये उत्सुकता

मुंबईचे खासदार कोण होणार?, मतदारांमध्ये उत्सुकता

googlenewsNext

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांसाठी सोमवारी मतदान पार पडणार आहे. यासाठी प्रशासनातर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे. निवडणुकीत मुंबईतून ११६ उमेदवार नशीब आजमावत आहेत. सहाही जागांवर महायुती आणि आघाडीत थेट लढत असली, तरी वंचित बहुजन आघाडी आणि मनसेमुळे निवडणुकीत रंगत निर्माण झाली आहे. मागील दोन्ही लोकसभा निवडणुकीत मुंबईने एकतर्फी कौल दिला होता. २०१४ साली सर्व जागा युतीकडे तर त्या आधी २००९ साली सहाही जागा आघाडीकडे होत्या. एकाच पारड्यात दान टाकण्याची प्रथा यंदा कायम राहणार की बदलणार, याबाबत उत्सुकता आहे. १०,०७३ मतदान केंद्रांवर सकाळी ७ वाजता मतदानाला सुरूवात होणार असून, ६ वाजता ते पूर्ण होईल.

प्रमुख उमेदवार
उमेदवाराचे नाव पक्ष
मिलिंद देवरा काँग्रेस
अरविंद सावंत शिवसेना
एकनाथ गायकवाड काँगेस
राहुल शेवाळे शिवसेना
संजय पाटील राष्ट्रवादी
मनोज कोटक भाजप
प्रिया दत्त काँग्रेस
पूनम महाजन भाजप
संजय निरुपम काँग्रेस
गजानन कीर्तिकर शिवसेना
ऊर्मिला मातोंडकर काँग्रेस
गोपाळ शेट्टी भाजप

क्रिटिकल मतदारसंघ
ज्या मतदान केंद्रांवर ७५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले होते किंवा ज्या केंद्रांवरील मतदानाच्या ७५ टक्के मतदान एकाच उमेदवारास झाले होते, तसेच ज्या मतदान केंद्रांवर सिंगल वोटरची संख्या जास्त आहे, अशी केंद्रे क्रिटिकल म्हणून निश्चित करण्यात येतात़ मुंबई उपनगरात अशी ६५ मतदान केंद्रे आहेत़ गेल्या मतदानाच्या वेळी असलेली कायदा व सुव्यवस्था विषयक परिस्थिती अशा बाबींच्या आधारावर या मतदान केंद्रांचे निर्धारण करण्यात येते़ मुंबई शहरात अशी ३५७ केंद्रे आहेत़ त्यांपैकी २६० मतदान केंद्रांवर बेव कास्टिंग करण्यात येणार आहे़ त्यानुसार, पोलीस बंदोबस्त व उपाययोजना करण्यात आल्या आहेत़

एकूण मतदार - १,०१,७२,०७७

पुरुष मतदार - ५५,५२,०५३

महिला मतदार - ४६,१९,३९८

मतदान केंद्रे - १००७३

मतदारांसाठी व्हीव्हीपॅट
लोकसभा निवडणुकीत पारदर्शी मतदान व्हावे, यासाठी प्रथमच व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरीफायबल पेपर आॅडिट्रेल) यंत्रांचा वापर केला जाणार आहे. यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. मतदान केल्यानंतर सात सेकंदांमध्ये मतदाराला पावती मिळेल. त्यावर निवडणूक चिन्ह, नाव व उमेदवाराचा मतपत्रिकेतील अनुक्रमांक नमूद असेल. या पावतीमुळे मतदाराने दिलेल्या मताची खात्री करणे शक्य आहे. ७ सेकंदांसाठी मतदान केल्याची पावती मतदाराला दिसेल. 

३२५ केंद्रांतून होणार लाइव्ह कास्ट
मुंबईतील सहा मतदारसंघांतील एकूण १०,०७३ मतदान केंद्रांपैकी ३२५ केंद्रांतील मतदान प्रक्रिया थेट लाइव्ह बेव कास्ट करण्यात येणार आहे. या केंद्रातील हालचालींवर निवडणूक आयोग थेट लक्ष ठेवणार आहे. विशेष म्हणजे, हे लाइव्ह कास्ट केवळ निवडणूक विभागच बघू शकणार आहे.
 

मतदार यादीत नाव कसे शोधाल?
https://ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर गेल्यानंतर डाव्या बाजूला दिलेल्या लिंकवरील इलेक्ट्रोल सर्ज इंजीनवर क्लिक करा. नावानुसार आणि आयडी कार्डनुसार इथे नाव तपासता येते. नावानुसार तपासायचे असेल, तर त्यावर क्लिक केल्यानंतर जिल्ह्यानुसार किंवा विधानसभानुसार असे दोन पर्याय दिले आहेत. विधानसभा मतदार संघानुसार नाव तपासायचे असेल, तर त्यावर क्लिक करावे. जिल्हा, मतदारसंघ, नाव अशी माहिती टाकल्यानंतर सर्चवर क्लिक केल्यानंतर यादीतील तुमचे नाव दिसेल.

https://www.nvsp.in या संकेतस्थळावर गेल्यानंतर सर्च युवर नेम इन इलेक्टोरल रोल वर क्लिक करा. राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टल मे आपका स्वागत है, असे वाक्य झळकेल. मतदान केंद्राची माहिती जाणून घेऊ शकता. या माहितीची प्रिंटही काढता येते.
मतदार यादीत नाव नोंदविणे, नाव शोधणे, नावात पत्त्यात बदल करण्यासाठी अर्ज करू शकता.  बीएलओची माहितीही मिळू शकेल. निवडणूक अधिकाऱ्याची माहितीही यावर उपलब्ध आहे. कंटिन्यू या लिंकवर क्लिक केल्यानंतर दोन पद्धतीने नाव शोधण्याची सुविधा उपलब्ध आहे. नाव, वय, जन्मतारीख, राज्य, जिल्हा, जिल्हा विधानसभा क्षेत्र ही माहिती टाकल्यानंतर मतदार यादीत नाव शोधता येते. यासह मतदार ओळखपत्र क्रमांक टाकूनही नाव शोधता येते.

Web Title: Who will be the Mumbai MP?, Curiosity among the voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.