लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 09:32 IST2025-11-09T09:31:13+5:302025-11-09T09:32:13+5:30

Mumbai Suburban Railway News: मध्य रेल्वेच्या सँडहर्स्ट रोड स्टेशनजवळ गुरुवारी झालेल्या अपघातासह छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर (सीएसएमटी) झालेल्या आंदोलनाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

Who risked the lives of the passengers? GRP to investigate Sandhurst Road accident | लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे

लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे

मुंबई - मध्य रेल्वेच्या सँडहर्स्ट रोड स्टेशनजवळ गुरुवारी झालेल्या अपघातासह छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर (सीएसएमटी) झालेल्या आंदोलनाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) परिसरात आंदोलनाची परवानगी असताना ते स्टेशनवर कसे पोहोचले; तसेच लोकलचा खोळंबा होऊन प्रवाशांचे जीव कसे गेले, याबाबतचा अहवाल मागवल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. सँडहर्स्ट रोड स्टेशन परिसरातील अपघाताची चौकशी वाशी लोहमार्ग पोलिस करणार आहेत.

व्हीजेटीआय रिपोर्टच्या आधारे मुंब्रा दुर्घटनाप्रकरणी रेल्वे अभियंत्यांवर दाखल गुन्ह्याविरोधात सीएसएमटी स्टेशन परिसरामध्ये गुरुवारी रेल्वेच्या कर्मचारी संघटनांनी आंदोलन केले. लोकल ठप्प झाल्याने प्रवाशांनी ट्रॅकवरून चालण्यास सुरुवात केली. दरम्यान लोकल सुरू झाल्यावर पाच प्रवाशांना लोकलने उडवले. त्यात दोघांचा जीव गेला. संघटनांना डीआरएम कार्यालय परिसरात निदर्शनांची परवानगी दिली होती, असे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

४०० रुपये देऊन आणले आंदोलक ?
सीएसएसटी स्टेशनवरील आंदोलनाचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यात ४०० रुपये देऊन आंदोलक आणल्याचे समोर आले.
कामगारानेच पैसे घेऊन आंदोलनासाठी आल्याचे सांगितले. तर, एका फोटोत मध्य रेल्वे मजदूर संघाची रिबन दरवाजाला बांधून मोटरमनची वाट अडवल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीव संबंधित संघटनांच्या प्रतिनिधींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.
 
प्लॅटफॉर्मवर धरणे देण्याचे आम्ही ठरवले नव्हते; परंतु अचानक आंदोलक तिथे पोहोचले. प्रवासी अपघाताची जी घटना झाली, ती दुर्दैवी आहे; परंतु तिच्याशी आमचा काही संबंध नाही.
-प्रवीण बाजपेयी,
अध्यक्ष, सेंट्रल रेल्वे मजदूर संघ

संबंधित घटनांची चौकशी करून त्यांचा अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यालयाने विभागीय कार्यालयाला दिले आहेत.
-डॉ. स्वप्निल नीला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

लोकल पकडताना पडून तरुणाचा मृत्यू
नवी मुंबई : हार्बर मार्गावर पनवेल-सीएसएमटी धावती लोकल पकडण्याच्या प्रयत्नात तोल जावून पडल्याने वाशी रेल्वेस्थानकात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. जयेश मळेकर असे त्याचे नाव असून तो मुंबई सेंट्रल येथे राहणारा असल्याचे समजते. गुरुवारी संध्याकाळी ही घटना घडली. लोकल पकडताना तोल जावून पडल्याने जयेश गंभीर जखमी झाला. यात डोक्याला मार लागून गंभीर जखमा झाल्या होत्या. उपस्थितांना पोलिसांच्या मदतीने त्याला नवी मुंबई महापालिका रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. कामानिमित्त तो नवी मुंबईत आला होता. वाढत्या गर्दीमुळे मुंबई लोकलमधून पडून मृत्यू पावणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून याबाबत प्रवासी संघटनांनी चिंता व्यक्त केली आहे.

Web Title : सैंडहर्स्ट रोड दुर्घटना: यात्रियों के जीवन को खतरे में कौन डाल रहा है?

Web Summary : सैंडहर्स्ट रोड दुर्घटना और सीएसएमटी विरोध की जांच शुरू। प्रदर्शनकारियों को कथित तौर पर भुगतान किया गया; घातक दुर्घटना हुई। वाशी में पनवेल-सीएसएमटी लोकल से गिरकर युवक की मौत।

Web Title : Sandhurst Road Accident: Who is risking passengers' lives?

Web Summary : Inquiries begin into Sandhurst Road accident and CSMT protest. Protesters allegedly paid; fatal accident occurred. Young man dies falling from Panvel-CSMT local at Vashi.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.