Join us

24 वर्षात मुंबईकरांचे 21 हजार कोटी खड्यात टाकणारे वाझे कोण?; अमित साटम यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2021 16:32 IST

मुंबई उच्च न्यायालयाने स्वतःदाखल केलेल्या सूमोटो याचिकेत काही किंबहुना थातुरमातुर कंत्राटदारांवर पालिकेने कारवाई केली असे म्हटले आहे.

मुंबई- देशाची आर्थिक राजधानी आणि आंतरराष्ट्रीय शहर म्हणून ओळक असलेल्या मुंबईतील रस्त्यांची अवस्था तर रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ते अशी असा प्रश्न हा सर्वसामान्य मुंबईकरांना पडला आहे. आरटीआय मध्ये दाखल केलेल्या एका माहितीत महापालिकेने उत्तर देतांना असे स्पष्ट केले आहे की,गेल्या 24 वर्षात मुंबईकरांचे 21 हजार कोटी रुपये खड्यांमध्ये खर्च केले आहेत.  

मुंबई महानगर पालिकेत  सत्ताधाऱ्यांच्या टोळीने  गेल्या 24 वर्षात यामध्ये मोठा भ्रष्टाचार केला असा आरोप करत मुंबई महानगर पालिकेत भ्रष्टाचार करणारे हे वाझे कोण असा सवाल अंधेरी पश्चिम विधानसभा मतदार संघाचे आमदार अमित साटम यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी सोशल मिडीयावर व्हिडिओ व्हायरल केला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने स्वतःदाखल केलेल्या सूमोटो याचिकेत काही किंबहुना थातुरमातुर कंत्राटदारांवर पालिकेने कारवाई केली असे म्हटले आहे. मात्र आजही आंतरराष्ट्रीय शहर असलेल्या मुंबईच्या रस्त्यांची दयनीय अवस्था असून दरवर्षी मुंबईचे रस्ते हे खड्यात गेले ही वस्तुस्थिती आहे. तुमचे -आमचे करदात्या मुंबईकरांचे गेल्या 24 वर्षात 21 हजार कोटी रुपये खड्यांत गेले मात्र रस्त्यांची अवस्था आहे तशीच आहे अशी टिका त्यांनी केली.

टॅग्स :अमित साटमभाजपारस्ते वाहतूक