CM फडणवीसांच्या विश्वासू, मेट्रो वूमन ते मुंबईच्या पहिल्या महिला आयुक्त; कोण आहेत अश्विनी भिडे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 09:40 IST2026-03-31T09:37:31+5:302026-03-31T09:40:46+5:30
Who Is Ashwini Bhide: मुंबईच्या आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करायची, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात वर्षा निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक झाली.

CM फडणवीसांच्या विश्वासू, मेट्रो वूमन ते मुंबईच्या पहिल्या महिला आयुक्त; कोण आहेत अश्विनी भिडे?
Who Is Ashwini Bhide: मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर वेगाने अनेक घडामोडी घडत आहेत. रितू तावडे या महापौर झाल्यानंतर आता मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त म्हणून ज्येष्ठ सनदी अधिकारी आणि मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त मुख्य सचिव अश्विनी भिडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकीकडे महापौर रितू तावडे तर दुसरीकडे आयुक्त अश्विनी भिडे असल्याने मुंबई महापालिकेत महिलाराज येत आहे.
मुंबईच्या आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करायची, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यात वर्षा निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत चर्चा झाल्यानंतर अश्विनी भिडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. आयुक्तपदासाठी अश्विनी भिडे, अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. मिलिंद म्हैसकर, एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असीम गुप्ता यांची नावे चर्चेत होती, पण अश्विनी भिडे यांचे नाव सुरुवातीपासूनच आघाडीवर होते.
CM फडणवीसांच्या विश्वासू, मेट्रो वूमन ते मुंबईच्या पहिल्या महिला आयुक्त अश्विनी भिडे
- अश्विनी भिडे या १९९५ बॅचच्या IAS अधिकारी आहेत.
- अश्विनी भिडे या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत आहेत.
- मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारीही अश्विनी भिडे सांभाळत आहेत.
- BMC च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला आयुक्त होण्याचा मान अश्विनी भिडे यांना मिळाला आहे.
- मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून पायाभूत प्रकल्पांमध्ये उल्लेखनीय कामगिरी भिडे यांनी केली आहे.
- अश्विनी भिडे या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विश्वासातील मानल्या जातात.
- अश्विनी भिडे यांची मुंबईला ओळख आहे ती मेट्रो वूमन अशी.
- मुंबईत मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या उभारणीत व्यवस्थापकीय संचालक म्हणून महत्त्वाचा वाटा राहिला आहे.
- मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्तपदही अश्विनी भिडे यांनी भूषविले आहे.
- शालेय शिक्षण विभागाच्या सचिव, एमएमआरडीएच्या अतिरिक्त महानगर आयुक्त म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.
- अत्यंत कार्यक्षम अधिकारी असा अश्विनी भिडे यांचा लौकिक आहे.
- मुंबई शहरातील पायाभूत सुविधा व प्रशासनातील महत्त्वाचे प्रकल्प हाताळण्याची जबाबदारी अश्विनी भिडे यांच्यावर असणार आहे.
- अश्विनी भिडे यांची नियुक्ती मुंबईतील प्रशासन आणि पायाभूत विकासासाठी महत्त्वाची मानली जात आहे.