सीमा महांगडे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबईच्या महापौरपदासाठी गुरुवारी चक्राकार पद्धतीने आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. गेल्या वेळी या पदासाठी अनुसूचित जाती महिला आणि खुला प्रवर्गासाठी आरक्षण पडले होते. त्यामुळे कुठल्या आरक्षणाचे पक्षनिहाय किती नगरसेवक विजयी झाले आहेत, याचा लेखाजोखा राजकीय पक्ष तयार करत आहेत. आरक्षण निश्चित झाल्यानंतर महापौरपदासाठी कुणाला संधी देता येईल, याबाबतच्या हालचालींना वेग येणार आहे.
राज्य शासनाच्या नगरविकास विभागामार्फत मंत्रालयात महापौरपदासाठी आरक्षणाची सोडत गुरुवारी सकाळी ११ वाजता काढली जाणार आहे. या प्रक्रियेकडे सर्वच राजकीय पक्ष, इच्छुक नगरसेवकांचे लक्ष लागले आहे. आरक्षण कोणत्या प्रवर्गासाठी निघणार यावर इच्छुकांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे.
हे आहे महत्त्वाचे
मुंबई महापालिका निवडणुकीत महापौरपदाच्या सोडतीमध्ये महापौरपद हे अनुसूचित जाती (एससी) किंवा अनुसूचित जमाती (एसटी) या राखीव प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यास या प्रवर्गासाठी राखीव असलेल्या प्रभागातील सदस्यच महापौरपदाची निवडणूक लढवू शकतो. मात्र प्रत्यक्षात खुल्या प्रवर्गातून निवडणूक लढवून निवडून आलेला संबंधित आरक्षित प्रवर्गाचा सदस्यदेखील महापौरपदाची निवडणूक लढवू शकणार आहे. मात्र, त्यासाठी संबंधित सदस्याकडील जातीचे प्रमाणपत्र हे जात पडताळणी समितीने वैध ठरविलेले असणे आवश्यक आहे.
असे होते महापौर आरक्षण
- २००० सर्वसाधारण; हरेश्वर पाटील
- २००२ एससी; महादेव देवळे
- २००५ सर्वसाधारण; दत्ताजी दळवी
- २००७ ओबीसी महिला; डॉ. शुभा राऊळ
- २००९ सर्वसाधारण महिला; श्रद्धा जाधव
- २०१२ सर्वसाधारण; सुनील प्रभू
- २०१४ एससी महिला; स्नेहल आंबेकर
- २०१७ सर्वसाधारण; विश्वनाथ महाडेश्वर
- २०२० सर्वसाधारण; किशोरी पेडणेकर
Web Summary : Mumbai gears up for the mayor's reservation draw. Parties analyze councilor numbers by reservation category. The draw determines eligibility for the mayoral post, spurring political activity. The state government will conduct the draw, influencing political futures.
Web Summary : मुंबई महापौर आरक्षण ड्रा के लिए तैयार है। पार्टियां आरक्षण श्रेणी के अनुसार पार्षद संख्या का विश्लेषण करती हैं। ड्रा महापौर पद के लिए पात्रता निर्धारित करता है, जिससे राजनीतिक गतिविधि बढ़ती है। राज्य सरकार ड्रा आयोजित करेगी, जो राजनीतिक भविष्य को प्रभावित करेगी।