Join us  

पंकजा मुंडेंच्या शुभेच्छा स्विकारताना धनुभाऊंनी लगावला खोचक टोला 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 10:46 PM

पिंपरी चिंचवडमधील आयोजित सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात धनंजय मुंडेंनी पंकजांच्या

मुंबई - शुक्रवारी गहिनीनाथ गडाच्या निमित्ताने सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि माजी मंत्री पंकजा मुंडे एकाच मंचावर आल्याचं पाहायला मिळालं. यावेळी, पंकजा यांनी ओझरत्या पद्धतीने धनंजय मुंडेंचं अभिनंदन करून त्यांना मंत्रिपदाबद्दल शुभेच्छा दिल्या. धनंजय मुंडे व्यासपीठावरुन निघून गेल्यानंतर आपल्या भाषणात बोलताना, सामाजिक न्यायमंत्री म्हणून मी शुभेच्छा देते, असे पंकजा यांनी म्हटले होते. पंकजांच्या या शुभेच्छांचा धनंजय यांनी स्विकार केला आहे.

पिंपरी चिंचवडमधील आयोजित सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात धनंजय मुंडेंनी पंकजांच्या शुभेच्छांचा स्विकार करत असल्याचे म्हटले. मात्र, सहजपणे स्विकार करतील ते धनंजय मुंडे कसले?. धनंजय मुंडेंनीही शुभेच्छा स्विकारताना पंकजा यांना खोचक टोलाही लगावला. आजपर्यंत मला त्यांच्या शुभेच्छा मिळाल्या नव्हत्या. कालही मला त्या ऐकायला मिळाल्या नाहीत. माध्यम आणि सोशल मीडियातून मला याबाबत समजलं. त्यांनी मनापासून शुभेच्छा दिल्याचा मला आनंद आहे. शेवटी उशिरा का होईना, वामनभाऊंच्या पदपस्पर्शाने पावन झालेल्या गहिनीनाथ गडावरती, त्यांना मला शुभेच्छा देण्याची सद्बुद्धी मिळाली, मला या गोष्टीचा नक्कीच आनंद आहे, असे धनंजय मुंडेंनी म्हटले आहे. तसेच, त्या शुभेच्छा मला सर्वसामान्य माणसांची सेवा करण्यासाठी नक्कीच प्रेरणा देत राहतील, असे म्हणत धनंजय यांनी पंकजांना टोला लगावला.

दरम्यान, धनंजय मुंडेंनी शुभेच्छा स्विकारल्यानंतर पंकजा यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावेळी, नो कमेंट म्हणत पंकजा यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. यावरुन, अजूनही निवडणूक काळातील भाषणाबाजी आणि वैयक्तिक टीका-टीपण्णीचा राग संपुष्टात आला 

टॅग्स :पंकजा मुंडेधनंजय मुंडेबीडपरळीमुंबई