Join us
Daily Top 2Weekly Top 5

दहावी-बारावीनंतर कोणती ज्ञानशाखा निवडायची?, करिअर गोंधळ दूर करण्यासाठी मोफत मार्गदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 12:11 IST

दहावी आणि बारावीनंतर पुढे कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे, याबाबत अनेक विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम असतो.

मुंबई :दहावी आणि बारावीनंतर पुढे कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे, याबाबत अनेक विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम असतो. या पार्श्वभूमीवर मानसशास्त्रीय कसोट्यांद्वारे मोफत मार्गदर्शन व समुपदेशनासाठी शिक्षण विभागाच्या प्रादेशिक विद्या प्राधिकरणाकडून नोंदणी सुरू झाली आहे.

काही विद्यार्थ्यांना स्वतःची आवड, क्षमता आणि योग्य करिअर मार्ग ओळखणे कठीण जाते. योग्य शैक्षणिक संधी निवडण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने शिक्षण विभागातर्फे एप्रिलमध्ये मानसशास्त्रीय कसोट्यांद्वारे मोफत समुपदेशन केले जाणार आहे. त्याकरिता १४ मार्चपर्यंत नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणीनंतर विद्यार्थ्यांची तुकडीनुसार चाचणी, वैयक्तिक समुपदेशन होणार आहे. हे समुपदेशन पूर्णपणे मोफत होणार असून, पालकांनी व विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिक्षण विभागाच्या प्रादेशिक विद्या प्राधिकरणाच्या प्राचार्या मनीषा पवार यांनी सांगितले.

नोंदणी कुठे कराल?प्रादेशिक विद्या प्राधिकरण कार्यालय, एल्फिस्टन टेक्निकल हायस्कूल परिसर, सेंट झेवियर कॉलेजच्या शेजारी, मुंबई महापालिका मुख्यालयाच्या बाजूला, महापालिका मार्ग, फोर्ट, मुंबई.

विद्यार्थ्यांनी आपल्या परीक्षेच्या हॉल तिकीटाची छायांकित प्रत, शाळा आणि घरचा पत्ता, मोबाईल क्रमांक नोंदणीवेळी द्यायचा आहे.

अभ्यासक्रमांबाबत माहितीविविध ज्ञान शाखांचा पर्याय समजणे सोपे होणार आहे. पाल्याची आवड, अभ्यासक्रम उपलब्धता, आर्थिक बाजू सर्व पैलू समजून घेता येईल. प्रवेश परीक्षा आणि करिअर मार्ग निवडीसाठी समुपदेशन उपयुक्त ठरणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Free Career Guidance After 10th & 12th: Clear Your Confusion!

Web Summary : Mumbai students facing career confusion after 10th/12th can get free guidance. The Education Department offers counseling via psychological tests. Register by March 14th at the specified Mumbai office with required documents. Guidance will help understand options, course availability, and career paths.
टॅग्स :दहावीमुंबईकरिअर मार्गदर्शन