Join us

स्कूल बस असो की व्हॅन, फी परवडणार कशी?

By सचिन लुंगसे | Updated: June 9, 2025 13:19 IST

Mumbai News - नवीन शैक्षणिक वर्षात पालकांना पाल्याची शाळेची वाढलेली फी, महागलेले शैक्षणिक साहित्य याबरोबरच स्कूल बस अथवा व्हॅनच्या वाढीव शुल्काला सामोरे जावे लागणार आहे. 

- सचिन लुंगसे मुंबई : नवीन शैक्षणिक वर्षात पालकांना पाल्याची शाळेची वाढलेली फी, महागलेले शैक्षणिक साहित्य याबरोबरच स्कूल बस अथवा व्हॅनच्या वाढीव शुल्काला सामोरे जावे लागणार आहे. 

शहर आणि उपनगरातील शाळांसाठी असणाऱ्या स्कूल बसचा महिन्याचा खर्च हा सहज तीन हजार रुपये आहे. काही ठिकाणी तो पाच हजार आहे. तर, स्कूल व्हॅनचा महिन्याचा खर्च १२००, १५०० आणि दोन हजारांदरम्यान आहे. जोगेश्वरीतील उच्च दर्जाच्या शाळांतील पालकांना शाळेच्या बससाठी महिन्याला तीन हजार, तर स्कूल व्हॅनसाठी दोन हजार मोजावे लागत आहेत. कुर्ल्यात खासगी शाळांच्या बससाठी महिन्याला दोन ते अडीच हजार, तर स्कूल व्हॅनसाठी १,२०० बाराशे ते १,५०० रुपये मोजावे लागत आहेत. दहिसरमधील एका शाळेसाठी पालकांना केवळ बससाठी वर्षाला सुमारे ६० हजार मोजावे लागत आहेत.

‘प्रति किमी शुल्क ठरवा’स्कूल बस असो किंवा व्हॅन, त्यांनी नेमके किती पैसे घेतले पाहिजेत? यासाठी परिवहन विभागाने किलोमीटर प्रमाणे दर ठरविले पाहिजेत. मात्र तसे होत नाही. त्यामुळे पालकांवर आर्थिक ताण पडतो. याकरिता सरकारने नियमावल्ली काढली पाहिजे. याशिवाय सुरक्षेसाठी बसना जाळी असावी. फायर सेफ्टी आणि आरोग्य संदर्भातील सुविधा बसमध्ये असाव्यात. यापैकी बसमध्येच काहीच नसते. स्कूल व्हॅनमध्ये मुलांना कोंबून भरले जाते. फळी टाकून त्यावर बसविले जाते. स्कूल व्हॅनला कमी पैसे लागतात म्हणून पालकही दुर्लक्ष करतात, याकडे ग्लोबल पॅरेंटस टिचर्स असोसिएशनचे अध्यक्ष रोहित दंडवते यांनी लक्ष वेधले.

एका वेळेसाठी ३०-३५ रुपये भाडेस्कूल बस, व्हॅन न परवडणारे पालक सकाळी लवकर मीटर रिक्षा करून मुलांना शाळेत सोडायला जात आहेत. एक मीटर पडले, तरी एका वेळेला पालकांना सहज ३० ते ३५ रुपये रिक्षासाठी मोजावे लागत आहेत. तर, काही पालक मुलांना शाळेत पायी नेतात.

दरमहा कुठे किती शुल्क (रुपयांत)परिसर    बस     व्हॅनमालाड    २,२००    १,५०० कुर्ला    ३,०००    १,५०० भायखळा    १,२५०    -ट्रॉम्बे    -    २,००० चेंबूर    -    २००० चिंचपोकळी    -     १,००० ते १,२०० कांदिवली    -    ९,०० ते १,२००० 

टॅग्स :शाळाशिक्षण