Join us

महाराष्ट्रभूषण कार्यक्रमासाठी काेट्यवधीचा पैसा गेला कुठे? उद्धव ठाकरे यांचा सवाल, ढिसाळ नियोजनाचा ठपका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2023 08:46 IST

Uddhav Thackeray: ढिसाळ नियोजनामुळे झालेल्या दुर्घटनेमुळे महाराष्ट्रभूषण सोहळ्याला गालबोट लागले. या सोहळ्याच्या निमित्ताने श्रद्धेचा दुरुपयोग का केला? अप्पासाहेबांच्या प्रतिमेचा दुरुपयोग केला याचे उत्तर कोण देणार?

मुंबई :  ढिसाळ नियोजनामुळे झालेल्या दुर्घटनेमुळे महाराष्ट्रभूषण सोहळ्याला गालबोट लागले. या सोहळ्याच्या निमित्ताने श्रद्धेचा दुरुपयोग का केला? अप्पासाहेबांच्या प्रतिमेचा दुरुपयोग केला याचे उत्तर कोण देणार? या कार्यक्रमासाठी कोट्यवधी खर्च झाला तो पैसा कुठे गेला, असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्वव ठाकरे यांनी केला. 

सरकारने नेमलेल्या एक सदस्यीय समितीत कोण आहेत, त्याची मला कल्पना नाही. पण नि:पक्षपाती चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणाची नि:पक्षपाती चौकशी करून दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही ठाकरे यांनी केली. 

अपघाताचे किती राजकारण करायचे - राज ठाकरेमहाराष्ट्रभूषणचा सोहळा सकाळी आयोजित करायला नको होता किंवा राजभवनात सोहळा पार पडला असता तरी चालले असते. पण, तो अपघात आहे आणि अपघाताचे काय राजकारण करायचे, अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाकरे गटाला सुनावले.

टॅग्स :उद्धव ठाकरे