पश्चिम उपनगर वाहतूककोंडीतून कधी मुक्त होणार? वांद्रे ते दहिसर नेहमी ट्राफिक जाम!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 17:00 IST2025-11-05T17:00:04+5:302025-11-05T17:00:50+5:30
सीएसएमटी स्थानकातून ट्रेनने अडीच-तीन तासांत लोणावळा, नाशिकला पोहोचले येईल, पण पश्चिम द्रुतगती महामार्गावरुन दहिसर-गोरेगाव ते वांद्रे-कुर्ला कलानगरला पोहोचण्यात कित्येक तास वाहतूककोंडीत अडकून पडावे लागते

पश्चिम उपनगर वाहतूककोंडीतून कधी मुक्त होणार? वांद्रे ते दहिसर नेहमी ट्राफिक जाम!
सीएसएमटी स्थानकातून ट्रेनने अडीच-तीन तासांत लोणावळा, नाशिकला पोहोचले येईल, पण पश्चिम द्रुतगती महामार्गावरुन दहिसर-गोरेगाव ते वांद्रे-कुर्ला कलानगरला पोहोचण्यात कित्येक तास वाहतूककोंडीत अडकून पडावे लागते त्यामुळे पश्चिम उपनगर वाहतूककोंडीतून कधी मुक्त होणार? असा सवाल करण्यात येत आहे. सरकारने यावर ठोस उपाययोजना करावी, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.
केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्या पुढाकाराने पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. उत्तर मुंबईतील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी गोयल यांनी पालिकेच्या बोरिवलीच्या आर मध्य विभाग कार्यालयात गेल्या रविवारी आढावा बैठक घेतली. यावेळी पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यातून द्रुतगती महामार्गावरील वाहतूककोंडी होणारी तीन ठिकाणी शोधून ही समस्या दूर करण्यात येणार आहे.
द्वि-स्तरीय मार्गासाठी साकडे
१. गोरेगाव उड्डाणपूल, जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड जंक्शन आणि दहिसर टोलनाका यांसारख्या प्रमुख चौकांवर वारंवार वाहतूककोंडी होते. सागरी सेतू पार केल्यानंतर पश्चिम द्रुतगती वांद्रे ते दहिसरपर्यंत सकाळी व सायंकाळी वाहतूककोंडी अशते. आणि त्यातूनंच मर्ग काढत नागरिकांना अवघे २५ किलोमीटर अंतर पार करायला दोन ते अडीच तास लागतात. मात्र, येथील वाहतूककोंडी अद्याप सुटलेली नाही ही वस्तुस्थिती आहे.
हे लक्षात घेऊन येथील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी पश्चिम द्रुतगती महमार्ग द्वि-स्तरीय करावा, यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मे महिन्यात पत्रव्यवहार केला होता. मात्र, सरकारने याबाबत काही निर्णय घेतलेला नाही. तेसेच वाहतुककोंडी कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना केलेली नाही, असे उद्धवसेनेचे आमदार सुनील प्रभू म्हणाले.
मुंबईतील गर्दीच्या वेळेत अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालणे गरजेचे आहे. शहरातील वाढती वाहतूककोंडी, प्रामुख्याने गर्दीच्या वेळेत जड वाहनांच्या वाहतुकीमुळे होते. सकाळी ८ ते ११ ते सायंकाळी ५ ते रात्री ९ दरम्यान मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवरुन जाणारी ट्रक, ट्रेलर आणि मोठी मालवाहू वाहने यांसारखी जड वाहने वाहतुकीत अडथळा, विलंब आण अपघातांना कारणीभूत ठरतात. मुंबई वाहतूक विभागाने गर्दीच्या वेळेत शहरात अवजड वाहनांना प्रवेश देऊ नये. या वाहनांना रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेत मुंबईत परवानगी द्यावी.
- अॅड. गॉडफ्रे पिमेंटा, विश्वस्त, वॉचडॉग फाऊंडेशन