थंडी कधी पडणार; हवामान खात्याने दिले उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 21:49 IST2023-12-12T21:49:15+5:302023-12-12T21:49:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईचे किमान तापमान २४ हून २० अंशावर घसरले असले तरी अद्यापही मुंबईकरांना थंडीने चाहूल ...

थंडी कधी पडणार; हवामान खात्याने दिले उत्तर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईचे किमान तापमान २४ हून २० अंशावर घसरले असले तरी अद्यापही मुंबईकरांना थंडीने चाहूल दिलेली नाही. उलटपक्षी उन्हाचा आणि प्रदूषणाचा तडाखा कायम असून, मुंबईकरांना थंडीसाठी डिसेंबरच्या शेवटच्या किंवा जानेवारच्या पहिल्या आठवड्याची वाट पाहवी लागणार आहे.
सध्या किमान तापमान डिसेंबरच्या सध्याच्या दिवसांच्या सरासरीच्या पातळीत आलेले नाही. सध्याचे थंडीचे किमान तापमान सरासरीपेक्षा अधिकच आहे. डिसेंबरमधील थंडी याच पातळीत राहील. सध्याचे महाराष्ट्रातील तापमान भाग परत्वे हे १५ ते १७ च्या दरम्यान म्हणजे सरासरीपेक्षा २ डिग्रीने अधिक आहे. महाराष्ट्रातील दुपारचे कमाल तापमान सध्या २९ दरम्यान म्हणजे सरासरीपेक्षा १ ने कमी आहे. म्हणजे दुपारचा थंडावा अजुन आहेच, असे हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.
मंगळवारी मुंबईचे किमान तापमान २० अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आहे. बुधवारीही किमान तापमानाचा पारा २० अंशाच्या आसपास राहील. नंतर मात्र किमान तापमान सरासरी नोंदविण्यात येईल. उत्तरेकडे बर्फवृष्टी होण्यास सुरुवात झाल्यानंतर डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मुंबईकरांना थंडी जाणवेल.
- सुनील कांबळे, प्रमुख, मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभाग