नालेसफाईचा मुहूर्त कधी? कार्यादेश अंतिम टप्प्यात; ३१ मेपर्यंत ७५ टक्के गाळ उपशाचे लक्ष्य 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 14:56 IST2025-03-18T14:56:05+5:302025-03-18T14:56:30+5:30

नालेसफाईचे काम पावसापूर्वी ७५ टक्के, पावसाळ्यात १५ टक्के आणि पावसाळ्यानंतर १० टक्के अशा तीन टप्प्यांत केले जात असल्यामुळे ते ३१ मे पूर्वी होईल या पद्धतीने यंत्रणा  राबवण्यात येणार आहे.

When is the time for cleaning drains? Work order in final stage; Target of 75 percent silt removal by 31st May | नालेसफाईचा मुहूर्त कधी? कार्यादेश अंतिम टप्प्यात; ३१ मेपर्यंत ७५ टक्के गाळ उपशाचे लक्ष्य 

नालेसफाईचा मुहूर्त कधी? कार्यादेश अंतिम टप्प्यात; ३१ मेपर्यंत ७५ टक्के गाळ उपशाचे लक्ष्य 

मुंबई : चढ्या दराने निविदा दाखल करणाऱ्या कंत्राटदारासोबत वाटाघाटी करण्यात अखेर पालिकेला यश आले असून, नालेसफाईचे कार्यादेश अंतिम टप्प्यात आहेत. त्यामुळे येत्या २५ मार्चपर्यंत मुंबईतील छोट्या नाल्यांसह, मोठ्या नाल्यांसह, छोट्या नाल्यांच्या सफाईला सुरुवात होईल, अशी माहिती पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. विविध स्तरांतून नालेसफाईच्या भ्रष्टाचाराचा आरोप पालिकेवर झाला होता. 

नालेसफाईचे काम पावसापूर्वी ७५ टक्के, पावसाळ्यात १५ टक्के आणि पावसाळ्यानंतर १० टक्के अशा तीन टप्प्यांत केले जात असल्यामुळे ते ३१ मे पूर्वी होईल या पद्धतीने यंत्रणा 
राबवण्यात येणार आहे. मुंबईत पावसाळ्यात पाणी तुंबू नये, म्हणून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नदी व नाल्यांमधील गाळ काढण्याची कामे केली जातात. मुंबईत छोटे नाले, मोठे नाले आणि रस्त्यालगतच्या पर्जन्यवाहिन्या, पाणी निचरा होण्याच्या जागा यांमध्ये येणारी माती, कचरा, गाळ यामुळे अनेक वेळा पाणी भरण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे पालिकेतर्फे पावसाळ्याआधी नालेसफाईची कामे हाती घेण्यात येतात. 

दोन वर्षांसाठी २६ निविदा
यंदा नालेसफाईच्या कामांसाठी 
पुढील २ वर्षांसाठी एकूण २६ विविध निविदा परिमंडळाप्रमाणे मागवण्यात आल्या आहेत. 
दोन वर्षांसाठी मिळून ५८० कोटींपर्यंत हा खर्च जाण्याची शक्यता आहे. यंदा छोट्या नाल्यांच्या निविदा प्रक्रिया लवकर पूर्ण झाल्या. मात्र मोठ्या नालेसफाईच्या प्रक्रिया खोळंबल्या होत्या.

मिठी नदीची निविदा ही अंतिम टप्प्यात 
मिठी नदीचे पात्र अनेक ठिकाणी अतिशय रुंद आहे. ही बाब लक्षात घेता, नदीतून गाळ काढण्यासाठी ३५ मीटर लांब बूम, तसेच १.५ क्यूबिक मीटर क्षमतेची बकेट असणारे पोकलेन मशीन तैनात करणे, ही अट निविदेमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे.

जेणेकरून मिठी नदीतून गाळ काढण्याचे काम प्रभावीपणे करता येऊ शकणार आहे. ही निविदा प्रक्रिया न्यायालयाच्या कचाट्यात सापडली होती. दरम्यान या प्रक्रियेला ही हिरवा कंदील मिळाल्याने ही निविदा ही अंतिम टप्प्यात असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

नालेसफाईसाठीचा खर्च 
शहर भाग    ३९.४५ कोटी
पूर्व उपनगरे    १४८.३९ कोटी
पश्चिम उपनगरे    २५७.३५ कोटी
 

Web Title: When is the time for cleaning drains? Work order in final stage; Target of 75 percent silt removal by 31st May

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.