Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘नवऱ्याची बायको’ घरी येताच, पत्नीने घेतली पोलिसांत धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2018 03:33 IST

मालिकेत रंगलेल्या नाट्याप्रमाणे, पतीने विवाह झाल्यानंतरही परस्त्रीशी संबंध ठेवले आणि तिला थेट घरी घेऊन आला. ‘नवºयाची बायको’ घरी येताच, पत्नीने थेट पोलिसांत धाव घेतल्याचा प्रकार डोंगरीत उघडकीस आला.

मुंबई  - मालिकेत रंगलेल्या नाट्याप्रमाणे, पतीने विवाह झाल्यानंतरही परस्त्रीशी संबंध ठेवले आणि तिला थेट घरी घेऊन आला. ‘नवºयाची बायको’ घरी येताच, पत्नीने थेट पोलिसांत धाव घेतल्याचा प्रकार डोंगरीत उघडकीस आला. या प्रकरणी डोंगरी पोलिसांनी पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.डोंगरी परिसरात राहणाºया शायेजा (नावात बदल) हीचे वयाच्या १८व्या वर्षी नागपूरच्या काझीम रजा अजानी याच्यासोबत विवाह झाला. लग्नाच्या काही वर्षांतच काझीमचे अन्य एका तरुणीसोबत प्रेमसंबंध जुळले. ही बाब शायेजाला समजताच तिला धक्काच बसला. दोघांमध्ये खटके उडू लागले. मात्र, अनैतिक संबंधाबाबत पत्नीला समजल्यानंतरही तो तरुणीसोबत राजरोसपणे फिरत होता. या प्रकाराला कंटाळून सहा महिन्यांपूर्वी ती माहेरी निघून आली. याच दरम्यान काझीमने प्रेयसीसोबत विवाह केला आणि तिला घरी घेऊन आला. ही बाब शायेजाला समजताच, तिला धक्काच बसला.तिने याबाबत काझीमला जाबही विचारला. मात्र, तिचा अपमान करून तिला घरी धाडले. अखेर शायेजाने थेट पोलिसांत धाव घेतली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी काझीमसह त्याच्या नातेवाइकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणी शायेजाच्या सासरच्या मंडळींना नागपूरहून पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती डोंगरी पोलीस ठाण्याचे वपो.नि. संदीप भागडीकर यांनी दिली.पतीने प्रेयसीसोबत विवाह केला आणि तिला घरी घेऊन आला. ही बाब पत्नीला समजताच, तिने याबाबत पतीला जाब विचारला. मात्र, तिचा अपमान करून त्याने तिला घरी धाडले.

टॅग्स :गुन्हामुंबई