Join us
Daily Top 2Weekly Top 5

... जेव्हा अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस किराणा दुकानात येतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2020 15:36 IST

दुकानदारांसोबत आपण भागिदारी व्यवसाय सुरू केल्याची माहिती दिली

मुंबई - ऑनलाईन शॉपिंग क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असलेल्या अमेझॉन कंपनीने भारतात हजारो किराणा दुकानादारांसोबत भागिदारी केली आहे. संपूर्ण भारतात स्थानिक किराणा दुकानाच्या माध्यमातून सेवा देण्याचा अमेझॉनचा प्रयत्न आहे. ग्राहक आणि दुकानदार या दोघांसाठी अमेझॉनची ही योजना फायदेशीर ठरणार आहे. अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी याबाबत ट्विट करुन माहिती दिली.बेझोस हे या किराणा स्टोअर्स भागिदारी योजनेच्या निमित्ताने चौथ्यांदा भारतात आले होते. बेझोस यांनी ट्विट करुन स्थानिक दुकानदारांसोबत आपण भागिदारी व्यवसाय सुरू केल्याची माहिती दिली.

यामुळे ग्राहकांचा फायदा होणार आहे. तर, दुकानादारांनाही अतिरिक्त कमाई मिळणार असल्याचे त्यांनी म्हटलंय. मुंबईतील एका लोकल किराणा दुकानातून बेझोस यांनी आपल्या हाताने अमेझॉनची एक डिलिव्हरी दिली. बेझोस यांनी ट्विटरवरुन किराणा दुकानदारासोबतचा फोटो शेअर करत, दुकानदार अमोलचे आभार मानले आहेत. भारतात जवळपास 1 कोटी अशा किराणा दुकानदारांसोबत अमेझॉन जोडले गेले आहे. मॉम अँड पॉप स्टोअर्स असे या किराणा दुकानाच्या संकल्पनेला नाव देण्यात आले आहे.  तालुकास्तरावरील दुकानदारांना सोबत घेऊन अमेझॉनकडून आपला उद्योग वाढिवण्यात येत आहेत. त्यामुळे, ग्राहकांनाही विश्वासर्ह आणि योग्य दरात सेवा मिळणार आहे. तर, दुकानदारांनाही कंपनीकडून टक्केवारीनुसार पैसे देण्यात येणार आहे. दरम्यान, बेझोस यांना किराणा दुकानात पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. तर, तेथील स्थानिक उद्योजकही अवाक झाले होते. कारण, एक जगप्रसिद्ध उद्योजक मुंबईच्या एका कोपऱ्यातील छोट्या किराणा दुकानातून स्वत:च्या मालाची डिलिव्हरी देत होता.  

टॅग्स :अ‍ॅमेझॉनऑनलाइनव्यवसाय