जमीन बक्षीसपत्र म्हणजे काय; ते कसे करायचे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2023 18:55 IST2023-09-21T18:54:47+5:302023-09-21T18:55:10+5:30
कोणतीही व्यक्ती स्वतःच्या कष्टाने कमावलेली अथवा जंगम मिळकत जमीन स्वतःच्या इच्छेनुसार आपल्या वारसांना, वारसांपैकी एक अथवा

जमीन बक्षीसपत्र म्हणजे काय; ते कसे करायचे?
मुंबई :
कोणतीही व्यक्ती स्वतःच्या कष्टाने कमावलेली अथवा जंगम मिळकत जमीन स्वतःच्या इच्छेनुसार आपल्या वारसांना, वारसांपैकी एक अथवा वारस सोडून स्वतःच्या इच्छेनुसार इतर व्यक्तीत अथवा स्वयंसेवी संस्था, देशास देण्याची इच्छा लिखित स्वरूपात लिहून देते त्यास बक्षीस पत्र संबोधले जाते.
जमीन बक्षीसपत्र व्यवहार
आपण आपल्या मालकी हक्काची जमीन इतर कोणास कायमस्वरूपी देतो. तेव्हा त्या जमीन व्यवहारास बक्षीसपत्र असे म्हणतात.
मुद्रांक शुल्क किती?
महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम २०१७ नुसार महाराष्ट्र राज्य भेटवस्तू डीडच्या मालमत्तेच्या मूल्याच्या ३ टक्के मुद्रांक शुल्क आकारते आणि कुटुंबातील रक्तातील सदस्यांना कोणतेही पैसे न देता शेतजमीन भेट म्हणून दिली गेल्यास मुद्रांक शुल्क २०० रुपये आहे.
रजिस्ट्री करताना काय काळजी घ्याल?
बक्षीसपत्र रजिस्ट्रीमध्ये बक्षीस कोणाला देत आहोत, त्या व्यक्तीचे आपल्याशी नाते आणि स्पष्ट कारण लिहिणे महत्त्वाचे आहे.
यांनी उपस्थित राहणे अनिवार्य
मिळकत हस्तांतराचा दस्तावेज नोंदणी करताना त्यावर नोंदणी कायद्यानुसार लिहून देणारा व घेणारा सही व इतर सोपस्कारांसाठी सहदुय्यम निबंधक कार्यालयात उपस्थित राहणे गरजेचे आहे.
साक्षीदारांच्या सह्या गरजेच्या
बक्षीसपत्र साध्या कागदावर स्वहस्तेही करता येते. परंतु त्याला पुढे कोर्टात आव्हान दिले जाऊ शकते. त्यामुळे हून ठेवताना दोन साक्षीदारांच्या सह्या आवश्यक आहेत.