Join us  

मारियांकडून आणखी काय अपेक्षा करणार - अहमद जावेद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 5:47 AM

मात्र, राकेश मारिया यांच्या दाव्यावर प्रतिक्रिया देताना माजी पोलीस आयुक्त

मुंबई : राकेश मारिया यांनी त्यांच्या आत्मचरित्रात माजी पोलीस आयुक्त अहमद जावेद यांच्यावर निशाणा साधला आहे. मात्र मारियांकडून आणखी काय अपेक्षा करणार, असा प्रश्न उपस्थित करीत जावेद यांनी आरोप फेटाळले. गृहसचिवांनी मेसेजच्या माध्यमातून माझी तत्काळ बदली केल्याचे राकेश मारिया यांनी आत्मकथेत लिहिले आहे. त्यानंतर अहमद जावेद यांना पोलीस आयुक्तपदी नेमण्यात आले. जावेद आणि शीना बोरा हत्याकांडातील आरोपी पीटर मुखर्जी यांची चांगली मैत्री होती. जावेद त्याला ईदच्या पार्टीसाठी घरी बोलावत असत. त्यामुळे शीना बोरा हत्याकांड प्रकरणावर परिणाम होणारच, असा दावा राकेश मारिया यांनी पुस्तकात केला आहे.

मात्र, राकेश मारिया यांच्या दाव्यावर प्रतिक्रिया देताना माजी पोलीस आयुक्त अहमद जावेद म्हणाले, ‘त्यांचे आरोप बिनबुडाचे आणि आश्चर्यकारक आहेत. त्यामध्ये विसंगती, चुकीची माहिती आणि दिशाभूल करणारे संदर्भ दिले आहेत. त्यांनी लिहिण्यापूर्वी माझ्याकडे विचारणा केली असती तर मी त्यांना खरे संदर्भ दिले असते. मात्र मारिया यांच्याकडून आपण आणखी दुसरी काय अपेक्षा करू शकतो, असा सवाल त्यांनी शेवटी व्यक्त केला.

Rakesh Maria Book : राकेश मारिया यांच्या आरोपांची शहानिशा करणार - गृहमंत्री

 

Rakesh Maria Book : "दाऊदने कसाबची सुपारी घेतलेली, पण त्याला जिवंत ठेवायचेच होते"

 

Sheena Bora Murder Case : मारियांचे पुस्तकी दावे 'त्या' पोलीस अधिकाऱ्याने फेटाळले; पुस्तक खपासाठी मार्केटिंग

 

Video : Sheena Bora Murder Case : खळबळजनक! राकेश मारियांनी पुस्तकातून केला गौप्यस्फोट

पुस्तकाची विक्री, वेबसीरिजसाठी मार्केटिंग स्ट्रॅटेजी - देवेन भारतीदेवेन भारती यांनी राकेश मारिया यांनी त्यांच्याबाबत केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. राकेश मारिया यांच्या कुटुंबीयांचा बॉलीवूडशी संबंध आहे. त्यामुळे त्यांच्यावर पटकथा लेखनाचा प्रभाव असावा. हा प्रभाव त्यांच्यावर कायम राहिल्यामुळेच पुस्तकाची विक्री आणि वेबसीरिज बनवण्याची त्यांनी केलेली ही मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे, असा आरोप देवेन भारती यांनी मारिया यांच्यावर केला आहे.

टॅग्स :राकेश मारियामुंबई26/11 दहशतवादी हल्ला