Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘वडिलांचे नाव सोडले तर तुमच्याकडे काय आहे?’, उद्धव ठाकरेंना सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2023 06:01 IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंच्या आरोपांना प्रतिप्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे कर्तृत्व आपल्या कामातून दाखवले आहे. बोलणाऱ्यांकडे काय कर्तृत्व आहे. जर वडिलांची बाळासाहेबांची पुण्याई आणि नाव सोडले तर काय आहे तुमच्याकडे. काय म्हणून तुम्ही बोलताय? असा जळजळीत सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना केला.

महाराष्ट्रातील जनता कामाला महत्त्व देते या आरोपांना महत्त्व देत नाही.तुमचा सहानुभूती मिळविण्यासाठीचा जो खेळ सुरू आहे. तो खेळ लोक ओळखतात. त्यांनी अडीच वर्षांत काय केले, आम्ही सात-आठ महिन्यांत काय केलेय हे जनता जाणते. आम्हालाही खूप तिखट बोलता येते पण आम्ही मर्यादा पाळतो. ज्यांच्याबरोबर ते फिरताहेत, त्याबद्दल मी योग्य वेळी उत्तर देईन, असे प्रत्युत्तरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

टॅग्स :एकनाथ शिंदेउद्धव ठाकरे