Join us

पॉलिटेक्निक प्रवेशासाठी कोणती कागदपत्रे लागतात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2023 13:04 IST

आता  प्रवेशासाठी द्यावी लागणार परीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला. आता लगबग आहे ती विविध शाखांसाठी प्रवेश घेण्याची. पॉलिटेक्निक, अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आयटीआय प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रक, नोंदणीची प्रक्रिया याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. दीड लाखाहून अधिक प्रवेश १,६४,३९२ एकूण  जागांना प्रवेश दिले जाणार आहेत. आता  प्रवेशासाठी द्यावी लागणार परीक्षा

ही कागदपत्रे आवश्यक 

- जात, जमात, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग वैधता प्रमाणपत्र- खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या पात्रतेसाठीचे प्रमाणपत्र.- विद्यार्थी अनाथ असल्याचे अनाथ प्रमाणपत्र- नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र/ अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाइल सर्टिफिकेट)- उत्पन्नाचा दाखला- विद्यार्थी दिव्यांग असेल तर अपंगत्वाचे प्रमाणपत्र- संरक्षण सेवा व अल्पसंख्याक कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी विहित नमुन्यातील प्रमाणपत्रे- आधार क्रमांक व संलग्नित बँक खाते क्रमांक

ड्रोन टेक्निशियन शाखेत प्रवेश

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अकोला (मुलींची), धुळे, पुणे (मुलींची), सांगली, नाशिक, जालना, अमरावती, नागपूर, मुलुंड, अंबरनाथ, गडचिरोली, घनसावंगी अशा एकूण १२ संस्थांमधून ड्रोन टेक्निशियनसाठी नव्याने प्रवेशाला सुरुवात होईल. त्यामुळे भारत ड्रोन टेक्नॉलॉजी या तंत्रज्ञानात आत्मनिर्भर होता येईल, अशी माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. दिगंबर दळवी यांनी दिली आहे.

प्रवेश प्रक्रिया सुरू

तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत तंत्रनिकेतन पदविका (पॉलिटेक्निक) प्रथम वर्ष अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला १ जूनपासून प्रारंभ झाला आहे.  ही प्रवेश प्रक्रिया मोबाइल ॲपवरही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यंदाही  तीन फेऱ्या होणार आहेत.

 

टॅग्स :शिक्षणकरिअर मार्गदर्शन