लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) आणि वन विभागाने संयुक्त कारवाईत ८० लाख रुपयांची व्हेल माशाची उलटी कुर्ला पश्चिम परिसरातून जप्त केली. गुजरातहून मुंबईत या उलटीचा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला अटक करण्यात आली आहे.
वन विभागाचे कर्मचारी महेंद्र गिते हे शनिवारी रात्री उशिराने गस्त घालत असताना वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष डगळे यांच्या आदेशानुसार कुर्ला येथे मदतीसाठी दाखल झाले. कुर्ला पोलिस ठाण्याचे ‘एटीएस’चे पोलिस उपनिरीक्षक श्रीराम घोलप यांनी एका संशयित व्यक्तीकडे व्हेल माशाची उलटीसदृश पदार्थ आढळल्याची माहिती दिली होती. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाचे नाव विष्णूभाई राजूभाई मकवाना (२८) असून, तो गुजरातच्या अहमदाबादचा रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्याकडून व्हेल माशाची ६२७ ग्रॅम वजनाची उलटी जप्त करण्यात आली आहे.
बाजारभावानुसार त्याची अंदाजे किंमत ८० लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. यापैकी २७ ग्रॅम नमुना रासायनिक तपासणीसाठी राखून उर्वरित ६०१ ग्रॅम पदार्थ सीलबंद करण्यात आला.
Web Summary : ₹80 lakh worth of whale vomit was seized in Kurla, Mumbai, in a joint operation by the Forest Department and ATS. A man from Gujarat was arrested for attempting to sell the substance. The seized vomit weighed 627 grams.
Web Summary : मुंबई के कुर्ला में वन विभाग और एटीएस ने संयुक्त अभियान में 80 लाख रुपये की व्हेल की उल्टी जब्त की। गुजरात से एक व्यक्ति को इसे बेचने की कोशिश के आरोप में गिरफ्तार किया गया। जब्त उल्टी का वजन 627 ग्राम है।