Join us

पश्चिम रेल्वे कर्मचाऱ्यांनी तयार केले १ लाख २० हजार मास्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 18:52 IST

रेल्वे कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मास्क आणि सॅनिटायझर तयार करत आहेत.

 मुंबई : पश्चिम रेल्वे प्रशासनाच्यावतीने रेल्वे कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मास्क आणि सॅनिटायझर तयार करत आहेत. पश्चिम रेल्वेने १ लाख २० हजार ३२५ मास्क आणि १० हजार ३५९ लीटर सॅनिटायझरची निर्मिती केली आहे. पश्चिम रेल्वे प्रशासनामधील वाणिज्यिक, आरपीएफ, ऑपरेटिंग आणि मेकॅनिकल विभागातील रेल्वे कर्मचार्‍यांकडून  मास्क आणि सॅनिटायझर बनवत आहेत. हे मास्क वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, सफाई कर्मचारी, रेल्वे कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांना देण्यात येत आहेत.

कोरोना विषाणूशी लढण्यासाठी रेल्वे प्रशासन काम करत आहे. यासाठी मास्क आणि सॅनिटायझरचा पुरवठा कमी पडू नये, यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांकडून मास्क, सॅनिटायझर बनविले हात आहे. लॉकडाऊनमुळे काही कर्मचारी आणि घरातील सर्व सदस्य घरीच आहेत. या वेळेचा सदुपयोग या कर्मचाºयांनी केला आहे. पश्चिम रेल्वेच्या  लोअर परळ वर्कशॉपमध्ये २० हजार मास्क तयार करण्यात आले आहेत. कर्मचाºयांना   रुग्नालयासाठी करिता बेडशीट,उशांचे कवर,वैद्यकीय स्टाफ करिता कपड्यांचे २० सेट, १०० कॅप तयार केल्या आहेत. अहमदाबाद विभागातील कर्मचाºयांनी सामुहिकरित्या दीड हजार मास्कची निर्मिती केली आहे. यामध्ये क्रेन ड्राईव्हर, फिटर,कारपेटंर, वरिष्ठ सेक्शन इंजिनियर यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा समावेश आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिली.

टॅग्स :कोरोना सकारात्मक बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस