Join us

फॉर्च्युनर घ्यायला गेले आणि डॉक्टरला फसवले, बँकेचा रिकव्हरी मॅनेजर सांगत घातला गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2023 10:22 IST

Mumbai: कारचे लोन थकलेल्या गाड्यांचा लिलाव होत असल्याची फसवी जाहिरात फेसबुकवर देत भामट्याने स्वतःला बँक ऑफ बडोदाचा रिकव्हरी क्रेडिट मॅनेजर म्हणवत एका डॉक्टरला लाखो रुपयांचा चुना लावण्यात आला.

मुंबई - कारचे लोन थकलेल्या गाड्यांचा लिलाव होत असल्याची फसवी जाहिरात फेसबुकवर देत भामट्याने स्वतःला बँक ऑफ बडोदाचा रिकव्हरी क्रेडिट मॅनेजर म्हणवत एका डॉक्टरला लाखो रुपयांचा चुना लावण्यात आला. हा प्रकार कांदिवली परिसरात घडला असून, याप्रकरणी डॉ. प्रभात शहा (५२) यांनी तक्रार केली आहे.

फेसबुकवर त्यांना एस. कुमार या फेसबुक आयडीवर अज्ञात व्यक्तीच्या अकाउंटवर वाहन विक्रीची जाहिरात दिसली. त्यामध्ये फॉर्च्युनर कार १९ लाखांमध्ये विक्री करण्यात येणार असल्याचे नमूद केले होते. त्यामध्ये एक व्हाॅट्सॲप नंबरही देण्यात आला होता. स्वस्तात कार मिळत असल्याच्या आमिषाला ते भुलले आणि ती त्यांनी गाडी खरेदी करण्याचे ठरवले. मात्र, त्यांची फसवणूक झाली.

अशा प्रकारे ओढले लुटीच्या जाळ्यातफॉर्च्युनर गाडी खरेदी करायची आहे, असे डॉक्टर शहा यांनी त्या व्यक्तीला सांगितले. त्यावर बँक आता बंद झाली असून मला याबाबत बँक मॅनेजरशी चर्चा करावी लागेल. त्यामुळे तुम्ही मला फोन करा, असे त्यांना सांगण्यात आले. दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी फोन केल्यावर त्या व्यक्तीने आधार कार्ड, पॅन कार्ड, दोन मोबाइल नंबर आणि मोटर वाहनाची जी किंमत आहे त्याच्या तीन टक्के रक्कम भरावी लागेल, असे सांगत आयडीबीआय बँकेचा अकाउंट नंबर दिला. हे अकाउंट रामकुमार सिंग नामक व्यक्तीच्या नावावर होते. त्यानुसार डॉक्टरांनी ५७ हजार रुपये पाठवले. लोनसाठी पुन्हा त्यांच्याकडून ५ लाख ३० हजार रुपये मागण्यात आले. पैसे दिल्यानंतर सोलापूरला बोलविले. डॉ. शहा हे त्या ठिकाणी गेल्यावर त्यांना कोणतीही गाडी सापडली नाही.

टॅग्स :गुन्हेगारीधोकेबाजीमुंबई