ऑनलाइन फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत. आज मुंबईमधून अशीच एक फसवणुकीची घटना समोर आली, ७१ वर्षीय एका महिलेने मोबाईलवरुन ऑनलाइन दूध ऑर्डर केले. ऑर्डर केल्याच्या काही मिनिटातच महिलेच्या खात्यावरुन १८.५ लाख रुपये गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीची आहे. वडाला येथील महिलेला एक कॉल आला. या कॉलवरील व्यक्तीने दूध कंपनीतील कर्मचारी असल्याचे सांगितले. त्याने महिलेला दूध ऑर्डर करण्यासाठी डिटेल्स भरायला सांगितल्या. यावेळी त्या कर्मचाऱ्याने मोबाईलवर एक लिंक पाठवली.
फसवणूक करणाऱ्याने महिलेला लिंकवर क्लिक करण्यास आणि कॉल डिस्कनेक्ट न करता पुढच्या माहितीचे पालन करण्यास सांगितले. यावेळी हा कॉल एका तासापेक्षा जास्त वेळ सुरू होता.यामुळे ती महिला वैतागली त्यांनी तो कॉल कट केला. पण, दुसऱ्या दिवशी फसवणूक करणाऱ्याने पुन्हा फोन केला आणि महिलेकडून काही अधिक माहिती घेतली.
पैसे गेल्याचे कळताच धक्का बसला
पुढं काही दिवसांनी ती महिला बँकेत कामासाठी गेली त्यावेळी त्या महिलेला एका खात्यावरुन १.७ लाख रुपये गेल्याचे कळाले. यावेळी त्या महिलेने सर्वच दोन्ही खात्यांची माहिती घेतली. त्यावेळी १८.५ लाख रुपये गेल्याची समजले. यावेळी त्या महिलेला धक्का बसला.